ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिकची खास इलेक्ट्रिक स्कूटर येणार; डिलिव्हरी बॉयंसाठी 50 क्युबिक फूट कार्गो स्टोरेजची सुविधा!

ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी गिग वर्कर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी खास इलेक्ट्रिक स्कूटर विकसित करण्याचा विचार करत आहे. यात 50 क्युबिक फूट काढता येणारे कार्गो स्टोरेज मिळू शकते. काम संपल्यानंतर स्टोरेज काढून स्कूटरचा कौटुंबिक वापर करता येईल. पुढील काही महिन्यांत नवीन वाहन सादर होण्याची शक्यता आहे.
Greaves Electric Special Cargo Scooter for Delivery Partners
Greaves Electric Special Cargo Scooter for Delivery Partners (फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 
  • ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक गिग वर्कर्ससाठी नवीन कार्गो इलेक्ट्रिक स्कूटर विकसित करण्याच्या तयारीत आहे.

  • स्कूटरमध्ये 50 क्युबिक फूट काढता येणाऱ्या सामान स्टोरेजची व्यवस्था असू शकते.

  • कंपनी पुढील 6 महिन्यांत नवीन इलेक्ट्रिक 3-व्हीलर सादर करण्याच्या तयारीत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी नव्या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. कंपनी गिग वर्कर्स, डिलिव्हरी पार्टनर्स आणि लास्ट-माईल डिलिव्हरीसाठी खास इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकसित करण्याचा विचार करत आहे. या स्कूटरमध्ये सामान वाहून नेण्यासाठी वेगळे कार्गो स्टोरेज असेल. विशेष म्हणजे, काम संपल्यानंतर हे स्टोरेज काढून त्याच स्कूटरचा वापर वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवासासाठी करता येणार आहे.

Greaves Electric Special Cargo Scooter for Delivery Partners
Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

डिलिव्हरी बॉयंसाठी कशी असेल नवीन इलेक्ट्रिक स्कूटर?

ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास सिंह यांनी CII Future of Mobility in India Conference 2026 दरम्यान या संकल्पनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये तब्बल 50 क्युबिक फूट सामान ठेवता येईल, अशी स्टोरेज व्यवस्था करण्याचा कंपनीचा विचार आहे.

सध्या अनेक डिलिव्हरी पार्टनर्स दिवसभर फूड डिलिव्हरी, ई-कॉमर्स पार्सल आणि इतर वस्तू पोहोचवण्यासाठी दुचाकी वापरतात. पण काम संपल्यानंतर त्याच वाहनाचा वैयक्तिक वापर करताना मोठ्या डिलिव्हरी बॉक्समुळे अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन ग्रीव्ह्जने काढता येणाऱ्या कार्गो स्टोरेजची संकल्पना मांडली आहे. यामुळे एकाच इलेक्ट्रिक वाहनाचा व्यावसायिक आणि घरगुती अशा दोन्ही कारणांसाठी वापर करता येईल.

कंपनीने पुढील काही महिन्यांत या सेगमेंटसाठी नवीन वाहन सादर करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील 2 ते 3 वर्षांच्या वाढीच्या योजनेत गिग इकॉनॉमी आणि लास्ट-माईल मोबिलिटीला महत्त्व दिले जाणार आहे.

Greaves Electric Special Cargo Scooter for Delivery Partners
Mahindra Commercial Vehicles Price Hike: महिंद्राच्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती जानेवारीत वाढणार! जाणून घ्या डिटेल्स

इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटवरही भर

ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक केवळ दुचाकीपुरती मर्यादित राहणार नाही. कंपनी प्रवासी आणि सामान वाहतूक अशा दोन्ही गरजा पूर्ण करणारे नवीन इलेक्ट्रिक 3-व्हीलर विकसित करत आहे. पुढील 6 महिन्यांत ही वाहने मार्केटमध्ये आणण्याचे कंपनीचे नियोजन आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी Eltra City आणि Eltra City Xtra, तर सामान वाहतुकीसाठी Eltra Cargo आहे.

कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ

आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचा महसूल 19% वाढून ₹786.19 कोटी झाला होता. या काळात VAHAN नोंदणीनुसार सुमारे 62,000 वाहनांची नोंदणी झाली. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान महसूल ₹679.88 कोटींवर पोहोचला. तसेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील कंपनीचा हिस्सा FY25 मधील 3.6% वरून FY27 च्या पहिल्या सहामाहीत 4.8% झाला. नोव्हेंबरच्या मिडलपर्यंत तो सुमारे 6% नोंदवला गेला. त्यामुळे नवीन वाहनांच्या माध्यमातून कंपनीला बिझनेस वाढवण्याची संधी मिळू शकते.