फोटो सौजन्य: Freepik
येणाऱ्या सणासुदीच्या मुहूर्तावर जर तुम्ही सुद्धा कार घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला होंडाच्या जबरस्त ऑफर्सबद्दल माहीत असणे गरजेचे आहे. Honda Cars ऑगस्ट महिन्यात भारतात उपलब्ध असलेल्या आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत सूट देत आहे.
कंपनीने ऑगस्ट महिन्यासाठी सवलत जाहीर केली आहे, जी Elevate SUV, City आणि Amaze sedan वर महिन्याच्या शेवटपर्यंत लागू असेल. एवढेच नाही तर स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीकडून अतिरिक्त सवलती दिल्या जातील. चला जाणून घेऊया, ऑगस्टमध्ये होंडा कारच्या खरेदीवर तुम्ही किती बचत करू शकता.
होंडाच्या Elevate SUV वर ऑगस्टमध्ये 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये ही कार Hyundai Creta आणि Maruti Suzuki Grand Vitara सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करत आहे. सवलतींमध्ये रोख सवलत, एक्सचेंज आणि लॉयल्टी बोनस देखील समाविष्ट आहेत. यासोबतच कंपनी त्यावर तीन वर्षांचे मेंटेनन्स पॅकेजही मोफत देत आहे. Honda Elevate चार प्रकारांमध्ये येते, जे SV, V, VX आणि ZX आहेत. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.58 लाख ते 16.20 लाख रुपये आहे.
या कार वर ऑगस्टमध्ये कंपनीकडून सर्वात मोठी सूट मिळत आहे. या महिन्यात, Amaze sedan वर 96,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही सेडान सब-कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मारुती डिझायर आणि ह्युंदाई ऑरा सारख्या कारशी स्पर्धा करते. रोख सवलत, लॉयल्टी आणि एक्सचेंज बोनस व्यतिरिक्त, यावर अतिरिक्त सवलत देखील दिली जात आहेत, ज्यात तीन वर्षाचे मोफत मेंटेनन्स पॅकेजचा समावेश आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.93 लाख ते 9.86 लाख रुपये आहे.
ऑगस्टमध्ये होंडाच्या सिटी आणि सिटी हायब्रीड सेडानवर 90,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. सेडानच्या ICE-ओन्ली व्हर्जनवर 88,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. सवलतींमध्ये रोख लाभ, एक्सचेंजेस आणि लॉयल्टी बेनिफिट प्रोग्रामच्या ऑफरचा समावेश आहे. Elevate आणि Amaze प्रमाणेच, या कारवर सुद्धा तीन वर्षांसाठी मोफत मेंटेनन्स पॅकेज मिळत आहे. होंडा सिटी सेडानची एक्स-शोरूम किंमत रु. 12.08 लाख आहे तर सिटी हायब्रिड सेडानची एक्स-शोरूम किंमत रु. 16.35 लाख आहे.