Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Activa 110 विकत घ्यायची आहे? 10 हजार डाउन पेमेंट केल्यावर किती असेल EMI?

होंडाच्या स्कूटर नेहमीच विक्रीच्या बाबतीत टॉपवर असतात. जर तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीत ही स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 30, 2024 | 06:15 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा सण चालू झाला आहे. हा सण तास प्रत्येक भारतीयाचा आवडता सण असतो. या सणासुदीत अनेक अनेक जण आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना भेटत असतो. तसेच या काळात अनेक जण स्वतःचा व्यवसाय किंवा काही तरी नवीन गोष्टी चालू करून एक नवी सुरुवात करत असतात.

दिवाळीत वाहनांच्या विक्रीला सुद्धा सुगीचे दिवस येतात. अनेक जण यावेळी कार आणि स्कूटर खरेदी करत असतात. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये स्कूटर म्हंटलं की अनेकांना होंडा कंपनी आठवते. कंपनीने लाँच केलेली अ‍ॅक्टिव्हा आजही मार्केटमध्ये एक लोकप्रिय स्कूटर आहे. म्हणूनच कंपनी सुद्धा ही स्कूटर वेगवेगळ्या व्हर्जनसह लाँच करत आहे.

हे देखील वाचा: 10 लाखाच्या कार्सच्या विक्रीला लागली उतरती कळा, मारुतीच्या चेअरमननी सांगितले कारण

एंट्री लेव्हल स्कूटर सेगमेंटमध्ये जपानी दुचाकी उत्पादक Honda ने Activa 110 ऑफर केली आहे. तुम्हीही दिवाळी 2024 च्या मुहूर्तावर ही स्कूटर खरेदी करणार असाल, तर दरमहा किती रुपयांची EMI भरून ती घरी आणू शकता याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

होंडा अ‍ॅक्टिव्हा 110 किंमत किती?

Honda Activa 110 ही जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी Honda ने एंट्री लेव्हल स्कूटर सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या स्कूटरच्या बेस व्हेरियंट STD ची एक्स-शोरूम किंमत 76684 रुपये आहे. त्यानंतर 7635 रुपये आरटीओ शुल्क आणि सुमारे 6,000 रुपये विमा शुल्क घेतले जाते. एक्स-शोरूम, आरटीओ आणि विमा शुल्क जोडल्यानंतर, या स्कूटरची ऑन-रोड किंमत 90388 रुपये होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.

दहा हजार डाऊन पेमेंट केल्यावर किती असेल ईएमआय?

तुम्ही दिवाळी 2024 च्या निमित्ताने Honda Activa 110 चे बेस व्हेरियंट STD विकत घेतल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केला जाईल. अशा परिस्थितीत, 10,000 रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 80,388 रुपयांची रक्कम फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 11 टक्के व्याजासह तीन वर्षांसाठी 80388 रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी दरमहा केवळ 2970 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

हे देखील वाचा: भारतातील ‘या’ व्यक्तीकडे आहे Rolls-Royce ची महागडी कार, किंमत एवढी की बांधाल स्वतःचा बंगला

कर्ज घेतल्यास एवढ्या रुपयांनी महाग पडेल स्कूटर

जर तुम्ही बँकेकडून 880388 रुपयांचे टू व्हीलर लोन तीन वर्षांसाठी 11 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला तीन वर्षांसाठी दर महिन्याला 2970 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, तीन वर्षांत तुम्हाला होंडा ॲक्टिव्हाच्या एसटीडी व्हेरियंटसाठी सुमारे 26541 हजार रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या स्कूटरची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 1.17 लाख रुपये असेल.

Web Title: How much emi will be after 10 thousand down payment for honda activa 110

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • a scooter

संबंधित बातम्या

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?
1

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव
2

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

ड्रॅगनच्या टेक्नॉलॉजीला मानला ! आता मिठाच्या मदतीने धावणार स्कूटर, भारतात केव्हा लाँच होणार Sea Salt Battery Technology?
3

ड्रॅगनच्या टेक्नॉलॉजीला मानला ! आता मिठाच्या मदतीने धावणार स्कूटर, भारतात केव्हा लाँच होणार Sea Salt Battery Technology?

TVS Ntorq 150 भारतात लवकरच होणार लाँच, मिळणार एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स
4

TVS Ntorq 150 भारतात लवकरच होणार लाँच, मिळणार एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.