

ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या कस्टमर्ससाठी तशी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या काही कारच्या किमती 1 डिसेंबर 2026 पासून वाढवणार आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम निवडक मॉडेल्स आणि व्हेरिएंट्सवर होणार आहे
कंपनीने दरवाढीमागचे कारण काय सांगितले?
ह्युंदाईने स्पष्ट केले आहे की, वाढत्या इनपुट कॉस्टचा मोठा भाग कंपनीने स्वतःच्या अंतर्गत उपाययोजनांमधून हाताळला आहे. खर्चाचे नियोजन, कार्यक्षमतेत सुधारणा आणि कॉस्ट ऑप्टिमायझेशनच्या माध्यमातून दरवाढीचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पण वाढलेला संपूर्ण खर्च स्वतः सहन करणे शक्य नसल्याने त्यातील काही लिमिटेड भाग कस्टमर्सकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून निवडक ह्युंदाई कारच्या किमती वाढणार आहेत.
या निर्णयामुळे डिसेंबरमध्ये कार खरेदी करणाऱ्या कस्टमर्सच्या बजेटवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. विशेषतः सध्याच्या किमतींमध्ये कार बुक करण्याची इच्छा असणाऱ्यांनी डीलरकडून नवीन दर आणि बुकिंगच्या अटींची माहिती घेणे योग्य ठरेल.
कोणत्या कारच्या किमती वाढणार?
ह्युंदाईने आपल्या संपूर्ण कार लिस्टमध्ये एकसमान दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला नाही. निवडक मॉडेल्स आणि त्यांच्या काही व्हेरिएंट्सच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. ही वाढ प्रत्येक कारसाठी वेगवेगळी असू शकते. पण कंपनीने कोणत्या मॉडेलच्या किंवा व्हेरिएंटच्या किमतीत किती वाढ होणार, याची सविस्तर माहिती दिलेली नाही.
त्यामुळे ह्युंदाईच्या लोकप्रिय कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या कस्टमर्सना नवीन दर जाहीर होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही अशा विविध प्रकारच्या कारचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्या मॉडेलवर या दरवाढीचा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या कस्टमर्ससाठी तशी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या काही कारच्या किमती 1 डिसेंबर 2026 पासून वाढवणार आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम निवडक मॉडेल्स आणि व्हेरिएंट्सवर होणार आहे. नव्या दरांनुसार कारच्या किमतीत जास्तीत जास्त 8,000 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे नवीन कार घेण्याचे नियोजन करणाऱ्यांना आता खरेदीपूर्वी किमतींचा विचार करावा लागणार आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाने 24 नोव्हेंबर 2026 रोजी दिलेल्या नियामक माहितीत या दरवाढीची घोषणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आणि इतर घटकांच्या किमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या खर्चाचा परिणाम वाहनांच्या एकूण प्रोडक्शन खर्चावर होत असल्याने किमतींमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे.