फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे पहिल्यापासूनच एक मोठे क्षेत्र राहिले आहे. त्यामुळेच इथे फक्त भारतीय नाही तर विदेशी ऑटो कंपनीज सुद्धा दमदार कार्स ऑफर करून आपले वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यातीलच एक विदशी ऑटो कंपनी म्हणजे ह्युंदाई मोटर्स.
ह्युंदाई ही साऊथ कोरिया वाहन उत्पादक कंपनी आहे, जिने भारतात अनेक उत्तम कार्स आणि एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. आता कंपनी ग्राहकांना नोव्हेंबरमध्ये आपल्या कार्सवर लाखो रुपये बचत करण्याची संधी देत आहे. चला जाणून घेऊया, कंपनी कोणत्या कार्सवर किती रुपयांचे डिस्काउंट देत आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाकडून नोव्हेंबरच्या महिन्यात आपल्या उत्तम कार्सवर आकर्षक डिस्काउंट देत आहे. कंपनी ग्राहकांना 2 लाखांपर्यंत ऑफर आणि डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट समाविष्ट आहे.
या महिन्यात तुम्ही Hyundai Grand i-10 Nios खरेदी करून जास्तीत जास्त 58 हजार रुपये वाचवू शकतात. ही बचत त्याच्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरीयंटवर करता येते. त्याच वेळी, या महिन्यात त्याच्या AMT व्हेरीयंटवर 30 हजार रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. हॅचबॅकच्या CNG व्हेरीयंटवर तुम्ही या महिन्यात 25,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.
नोव्हेंबर महिन्यात Hyundai च्या प्रीमियम हॅचबॅक i-20 वर देखील सूट मिळत आहे. कंपनी या कारवर कमाल 55 हजार रुपयांची ऑफर देत आहे. ही ऑफर त्याच्या मॅन्युअल व्हेरियंटवर उपलब्ध आहे. प्रीमियम हॅचबॅक कारच्या CVT व्हेरियंटवर 30 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. त्याच वेळी, या महिन्यात i-20 N लाइनवर ग्राहक 40 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
या महिन्यात Hyundai च्या कॉम्पॅक्ट साइज सेडान कार Aura वर देखील जबरदस्त ऑफर उपलब्ध आहेत. Aura खरेदीवर कंपनी 43 हजार रुपयांची कमाल ऑफर देत आहे. ही ऑफर त्याच्या CNG व्हर्जनवर आहे. पेट्रोल व्हेरियंट खरेदी करून तुम्ही 23 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता.
मायक्रो SUV सेगमेंटमध्ये कंपनीने ऑफर केलेल्या Exter वर तुम्ही 30,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. या SUV च्या खालच्या व्हेरियंट EX आणि EX(O) वर कोणतीही ऑफर दिली जात नाही. याशिवाय इतर सर्व पेट्रोल व्हेरियंटवर 30 हजार रुपयांची बचत होऊ शकते. SUV च्या CNG व्हर्जनवर 20,000 रुपये वाचवले जाऊ शकतात.
वरील कारव्यतिरिक्त ह्युंदाई व्हेन्यू, वेर्ना, टक्सन, व Kona EV या कार्सवर सुद्धा विशेष ऑफर कंपनीने जारी केली आहे.