फोटो सौजन्य: iStock
ह्युंदाई कंपनी भारतात अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या अपेक्षेनुसार कार्स लाँच करत आहे. कंपनीच्या अनेक कार्स आजही भारतीय कार मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. सध्या देशभरात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे आता देशात सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या काळात ज्याप्रमाणे ग्राहक स्वतःहून नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. अगदी तसेच ह्युंदाई कंपनीने आपल्या कार्सवर भन्नाट डिस्कॉउंट्स जारी केले आहेत. चाल अजनून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.
कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai द्वारे व्हेन्यू ऑफर केली जात आहे. सणासुदीच्या काळात या कंपनीची कार खरेदी करून तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता. Hyundai कडून मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही या महिन्यात म्हणेजच ऑक्टोबरमध्ये Venue खरेदी करून 80629 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस इत्यादींचा समावेश आहे.
Hyundai ची सर्वात स्वस्त कार म्हणून Grand Nios i10 ला हॅचबॅक विभागात आणले आहे. जर ही कार ऑक्टोबर 2024 च्या दरम्यान खरेदी केली तर, ही व्हेन्यूनंतर तुमची सर्वात मोठी बचत होऊ शकते. या महिन्यात कंपनीकडून या कारवर 58 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
या महिन्यात, i20 वर हजारो रुपयांच्या ऑफर दिल्या जात आहेत, जे Hyundai ची प्रीमियम हॅचबॅक म्हणून बाजारात उपलब्ध आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबरपर्यंत सणासुदीच्या काळात ही कार खरेदी केल्यास तुम्ही जास्तीत जास्त 55 हजार रुपयांची बचत करू शकता.
जर तुम्ही सणासुदीच्या काळात Hyundai द्वारे मायक्रो SUV म्हणून ऑफर केलेली Exeter खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनी 31 ऑक्टोबरपर्यंत या एसयूव्हीवर 42972 रुपयांची बचत करण्याची संधी देत आहे.
Hyundai कडून असेही सांगण्यात आले आहे की वेगवेगळ्या मॉडेल व्हेरियंटवर वेगवेगळ्या सवलती दिल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कोणतेही Hyundai ची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही जवळच्या शोरूमला भेट देऊन सवलतीच्या ऑफरबद्दल योग्य माहिती मिळवू शकता.