Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Tucson ला क्रॅश टेस्टमध्ये मिळाले 5 स्टार रेटिंग ! कंपनीची 5 स्टार रेटिंग मिळवणारी पहिली एसयूव्ही

ह्युंदाईची SUV कार ह्युंदाई टक्सनने भारत एनसीएपी (Bharat NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवून मोठं यश प्राप्त केले आहे. या कामगिरीमुळे ह्युंदाई कंपनीला आता टाटा, महिंद्राच्या यादीत स्थान मिळाले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 29, 2024 | 09:40 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल निर्माती कंपनी ह्युंदाईची SUV कार ह्युंदाई टक्सनने भारत एनसीएपी (Bharat NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवून मोठं यश प्राप्त केले आहे. टाटा आणि महिंद्रा यांच्या 5-स्टार SUV यादीत सामील होणारी टक्सन ही पहिली  ह्युंदाई SUV ठरली आहे. ह्युंदाई  टक्सनने प्रौढ प्रवासी संरक्षणात 32 पैकी 30.84 गुण मिळवले आहेत. बाल प्रवासी संरक्षणामध्ये देखील SUV ने 49 पैकी 41 गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. साइड पोल इम्पॅक्ट टेस्टमध्ये या गाडीला समाधानकारक रेटिंग प्राप्त झाले आहे.

परीक्षणासाठी वापरलेले कारचे मॉडेल

परीक्षणासाठी वापरण्यात आलेला मॉडेल ह्युंदाई टक्सन 2.0-लिटर पेट्रोल-एटी सिग्नेचर व्हेरिएंट होता. या व्हेरिएंटमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये समृद्ध आहेत, ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज, सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉइंट सीटबेल्टसह रिमाइंडर्स, मागील सीटसाठी ISOFIX अँकर्स आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) यांचा समावेश आहे. याशिवाय AIS-100 ची उपलब्धताही यात आहे.

प्रौढ प्रवासी आणि बालकाच्या संरक्षणात उत्तम कामगिरी

टक्सन प्रौढ प्रवासी संरक्षण (Adult Occupant Protection – AOP) मध्ये 32 पैकी 30.84 गुण मिळवले आहेत. या SUV ने फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्ट मध्ये 16 पैकी 14.84 गुण मिळवले, तर ओव्हरऑल प्रोटेक्शन मध्ये पूर्ण 16 पैकी 16 गुण मिळवले आहेत. या SUV ने यामुळे उत्कृष्ट संरक्षक प्रणाली प्रदान केल्याचे सिद्ध केले आहे. बालकांच्या संरक्षणासाठी (Child Occupant Protection – COP) टक्सन 49 पैकी 41 गुण मिळवले आहेत. डायनॅमिक टेस्टमध्ये 24/24 गुण आणि सीआरएस (Child Restraint System) इंस्टॉलेशन टेस्टमध्ये 12/12 गुण मिळवून SUV ने सर्वोच्च मानांकन मिळवलं आहे.

ह्युंदाई टक्सनचे इंजिन पर्याय आणि किंमत

ह्युंदाई  टक्सनची किंमत मुंबईत एक्स-शोरूम दराने 29.02 लाख रुपये ते 35.94 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारातील इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 2.0-लिटर पेट्रोल इंजिन 154 बीएचपी पॉवर आणि 192Nm टॉर्क निर्माण करते. या कारला सहा-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडलेले आहे. कारचे डिझेल इंजिन 194 बीएचपी पॉवर आणि 416Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा समावेश आहे.

कोरियन SUV च्या सुरक्षेचा नवा मानदंड

ह्युंदाई टक्सन भारतातील सुरक्षित वाहनांच्या यादीत स्थान मिळवत आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये या गाडीबद्दल विश्वास वाढत आहे. यात सखोल सुरक्षा वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, SUV ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करत आहे.

महिंद्रा आणि टाटा सारख्या ब्रँडच्या SUV गाड्यांनंतर ह्युंदाई टक्सन 5-स्टार रेटिंग मिळवून आपले स्थान निर्माण केले आहे. हे रेटिंग केवळ SUV च्या गुणवत्तेचा पुरावा नाही, तर भारतीय बाजारात सुरक्षा मानदंड वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

Web Title: Hyundai tucson gets 5 star rating in crash test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 09:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.