फोटो सौजन्य: iStock
कार चालवण्यात एक वेगळीच थ्रिल असते. त्यातही जर आपली कार एखादया लॉंग ट्रीपवर असेल तर अजूनच मज्जा. परंतु आजही कार चालवताना काही गोष्टी अनेकांना कळून येत नसतात. त्यातीलच एक म्हणजे कारचा वेग कमी करताना किंवा तिला थांबवताना अनेक जण विनाकारण ब्रेक दाबत असतात. यामुळे कारच्या पेर्फोर्मन्सवर वाईट परिणाम होऊ शकतो. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
क्लचचा वापर तेव्हा करावा जेव्हा तुम्हाला तुमच्या वाहनाचा गिअर बदलायचा असेल. वाहन जवळजवळ थांबत आहे, जसे की पूर्णपणे ब्रेक लावताना. क्लचला अनावश्यकपणे दाबल्याने इंजिन आणि ट्रान्समिशनमधील कनेक्शन तुटते, ज्यामुळे कारच्या चाकांवरचे नियंत्रण कमी होते. हे तुमच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते.
हे देखील वाचा: सणासुदीच्या काळात Tata Punch ची ‘ही’ लिमिटेड एडिशन कार लॉंच!
जेव्हा कारचा वेग कमी होतो, तेव्हा गिअरद्वारे इंजिन ब्रेकिंग होते, जे कारचा वेग नियंत्रित करते. जर तुम्ही क्लचला गरज नसताना दाबले तर ते इंजिन ब्रेकिंग थांबवते आणि तुम्हाला पूर्णपणे ब्रेकिंगवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ब्रेक लवकर खराब होऊन कारवरील नियंत्रण कमी होते.
जेव्हा क्लच आधीच दाबलेला असतो, तेव्हा कार न्यूट्रलमध्ये असते, ज्यामुळे अचानक अडथळ्यावर त्वरित कार रिऍक्ट करणे कठीण होऊ शकते. म्हणून, कारची स्थिरता आणि सुरक्षितता राखण्यासाठी, एखाद्याने गरज नसताना क्लच दाबणे टाळले पाहिजे.
तुम्ही क्लच सतत दाबल्यास, इंजिनला स्थिर करण्यासाठी कार अतिरिक्त इंधन वापरते. तसेच क्लचचा योग्य वापर केल्यास इंधनाची बचतही होऊ शकते.
प्रथम ब्रेकचा वापर करून कारचा वेग कमी करा. जेव्हा वेग खूप कमी असेल आणि गिअर बदलण्याची गरज भासेल तेव्हाच क्लच दाबा. जर कार थांबणार असेल तर क्लच आणि ब्रेक यांच्यात योग्य समन्वय साधा.
कारचा वेग कमी करताना गिअरनुसार वेग राखणे गरजेचे आहे. वेग आणि गिअरचे कॉम्बिनेशन वापरून, तुम्हाला क्लच कमीत कमी वापरावे लागेल.
कारचा वेग कमी करताना क्लचचा योग्य वेळी वापर करावा. जेव्हा गिअर बदलण्याची गरज भासेल किंवा कार थांबणार असेल तेव्हाच क्लच दाबा. अनावश्यक क्लच दाबल्याने कारवरील नियंत्रण सुटू शकतो. तसेच ब्रेक अकाली बिघडू शकतो आणि इंजिनवर त्याचा जास्त ताण येऊ शकतो.