फोटो सौजन्य: Freepik
लक्झरी कार्स नेहमीच भारतात एक चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच अनेक लक्झरी कार्स बनवणाऱ्या कंपनी सुद्धा भारतात चांगल्याच लोकप्रिय आहे. आजही जर एखादी लक्झरी कार आपल्याला रस्त्यावर जाताना दिसली की आपली नजर आपोआप तिच्यावर खिळली जाते. कित्येकांना असा सुद्धा प्रश्न पडतो की या कार्सची भारतात किती विक्री होत असेल.
नुकतेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन यांनी एक अहवाल प्रदर्शित केला आहे. या अहवालात मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये एकूण किती लक्झरी कार्स भारतात विकल्या गेल्या आहेत याचव्ही माहिती आहे. चला याबाबद्दल जाणून घेऊया.
भारतीय बाजारपेठेत लक्झरी कारच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये देशभरात लक्झरी कार्सच्या 2712 युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली आहे. तर अहवालानुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात देशभरात 2735 युनिट्सची विक्री झाली होती. या अहवालात मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू, लँड रोव्हर जग्वार आणि व्होल्वो यांसारख्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीची माहिती देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: Electric Bike घेण्याच्या विचारात आहात? मग नक्कीच ‘या’ 4 इलेक्ट्रिक बाईक्सचा विचार करा
गेल्या महिनाभरात मर्सिडीज बेंझच्या देशभरात सर्वाधिक लक्झरी कार्स विकल्या गेल्या आहेत. FADA च्या अहवालानुसार मर्सिडीज-बेंझच्या देशभरात 1234 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीने देशभरात 1111 युनिट्सची विक्री केली होती.
मर्सिडीजशिवाय बीएमडब्ल्यू कारलाही देशभरात चांगलीच मागणी आहे. मर्सिडीजनंतर कंपनीने सर्वाधिक कार्स विकल्या आहेत. अहवालानुसार, BMW ने ऑगस्ट 2024 मध्ये देशभरात 921 युनिट्स विकल्या आहेत. तर वार्षिक आधारावर कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 1109 युनिट्सची विक्री केली होती.
हे देखील वाचा: Electric Bike घेण्याच्या विचारात आहात? मग नक्कीच ‘या’ 4 इलेक्ट्रिक बाईक्सचा विचार करा
ऑगस्टमध्ये टाटाच्या मालकीच्या जग्वार आणि लँड रोव्हरच्या आलिशान कार आणि एसयूव्हीलाही चांगली मागणी होती. कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत 433 युनिट्स विकल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 267 मोटारींची विक्री केली होती.
स्वीडिश लक्झरी कार व्होल्वो देखील भारतीय बाजारपेठेत आपल्या कारची विक्री करत आहे. FADA च्या अहवालानुसार, कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये भारतात आपल्या कारच्या 104 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीने देशभरात 160 युनिट्सची विक्री केली होती.
अहवालानुसार, Audi AG ने ऑगस्ट 2024 मध्ये भारतात 20 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये 88 युनिट्सची विक्री केली होती.