(फोटो सौजन्य-AI एआय)
पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
3.0-लिटर पेट्रोल इंजिनचा नवा ऑप्शन
स्थानिक असेंब्लीमधून येणाऱ्या डिफेंडरमध्ये वेगवेगळ्या इंजिनचे ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये 2.0-लिटर पेट्रोल, 3.0-लिटर पेट्रोल, 3.0-लिटर डिझेल आणि दमदार V8 पेट्रोल इंजिनचा समावेश असू शकतो. नव्या 3.0-लिटर P400 पेट्रोल इंजिनमध्ये 6-सिलेंडर टर्बो युनिट आणि 48V माइल्ड-हायब्रिड टेक्नोलॉजी मिळते. हे इंजिन 400 PS पॉवर आणि 550 Nm टॉर्क देते. सध्याच्या 2.0-लिटर P300 पेट्रोल इंजिनमधून 300 PS पॉवर आणि 400 Nm टॉर्क मिळतो. तर 3.0-लिटर D350 डिझेल इंजिन 350 PS पॉवर आणि 700 Nm टॉर्क देते.
ऑफ-रोडिंगसाठी खास हार्डवेअर
डिफेंडरमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळते. कंपनीच्या D7x ॲल्युमिनियम-इंटेन्सिव्ह मोनोकॉक आर्किटेक्चरवर ही एसयूव्ही आधारित आहे. यात स्वतंत्र सस्पेन्शन, 2-स्पीड ट्रान्सफर केस आणि टेरेन रिस्पॉन्स सिस्टमसारखी ऑफ-रोडिंगसाठी उपयुक्त फीचर्स आहेत. निवडक व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रॉनिक एअर सस्पेन्शन आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड रिअर डिफरेंशियलही मिळते. डिफेंडरची कमाल वॉटर-वेडिंग कॅपसिटी 900 मिमीपर्यंत आहे.
मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
डिफेंडर ऑक्टा लोकल असेंब्लीमध्ये येणार?
डिफेंडर ऑक्टा या टॉप व्हेरिएंटचाही लोकल असेंब्ली कार्यक्रमात समावेश होऊ शकतो, पण याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. ऑक्टा मध्ये 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 पेट्रोल इंजिन असून ते 635 PS पॉवर आणि 750 Nm टॉर्क देते. यामध्ये खास सस्पेन्शन सेटअप, सुधारित चेसिस आणि स्वतंत्र ऑक्टा ड्रायव्हिंग मोड मिळतो.
स्थानिक असेंब्लीमुळे पूर्णपणे आयात केलेल्या गाड्यांवरील कस्टम ड्युटीचा भार कमी होऊ शकतो. त्यामुळे डिफेंडरची किंमत कमी ठेवण्याची कंपनीला संधी मिळू शकते. पण ₹89 लाखांची किंमत आणि कोणते व्हेरिएंट भारतात असेंबल होणार, याबाबत कंपनीची ऑफीशियल घोषणा होणे मात्र बाकी आहे.






