फोटो सौजन्य- X
महिंद्रा थार रॉक्स कारची डिलिव्हरी मागील आठवड्यापासून आठवड्यात सुरू झाली आहे. या कारला ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद हा न भूतो न भविष्यती असाच आहे. केवळ 1 तासात या कारने 1.76 बुकिंगचा विक्रम केला आहे. यावरुन या कारची भारतीय ग्राहकांमधली क्रेझ दिसून येते. वितरणाबाबत कंपनीने आपल्या खरेदीदारांना कारच्या तात्पुरत्या डिलिव्हरीच्या वेळापत्रकाबद्दल त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासनही दिले आहे. रिपोर्टनुसार असे दिसून येत आहे की वितरणास बराच वेळ लागू शकतो.
ऑटोमोटिव्ह बाजार विश्लेषण तज्ञ JATO च्या मते, या कार बुकिंगचे ऑर्डर मूल्य सुमारे 31,730 कोटी रुपये आहे. अपेक्षेपेक्षा जास्त बुकिंग नंबर्समुळे कार वितरणाचा प्रतीक्षा कालावधी हा एक वर्षापेक्षा जास्त काळ वाढवला जाऊ शकतो. महिंद्राच्या या अगोदरच्या कार्सनाही त्यात Scorpio N आणि XUV 700 च्या बुकिंगसाठीही असेच दिसून आले आहे. त्यामुळे कंपनीच्या कार्सवर लोकांची पसंती वाढत आहेच आणि ते कारसाठी वाट पाहू शकतात.
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar Roxx) पहिली कार 1.31 कोटी रुपयांना लिलाव
महिंद्रा थार रॉक्सचा पहिल्या युनिटचा तब्बल 1.31 कोटी रुपयांना लिलाव झाला आहे. ही किंमत सामान्य युनिटपेक्षा तब्बल 4 ते 5 पट जास्त आहे. VIN 001 असलेले पहिले थार रॉक्स कार खरेदी करणारे उद्योगपती आकाश मिंडा आहेत. ही कार 8 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत येथे वितरित करण्यात आली. लिलावाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. 15 ते 16 सप्टेंबर 2024 या कालावधीत 10,980 पेक्षा जास्त नोंदणी झाल्या होत्या.
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक आकाश मिंडा यांनी यापूर्वी 2020 मध्ये पहिल्या थार 3-डोरची पहिली कार लिलावामध्ये जिंकली होती. लिलावामध्ये जिंकलेली थार रॉक्स SUV नेबुला ब्लू रंगाची आहे आणि विशेष म्हणजे या कारवर आनंद महिंद्रा यांची स्वाक्षरी असलेला एक विशेष बॅज आहे.
Mahindra Thar Roxx बद्दल
थार रॉक्स मध्ये दोन इंजिन पर्यायांमध्ये ऑफर केले जातात – 2.0L टर्बो-पेट्रोल (TGDi), आणि 2.2L mHawk डिझेल इंजिन. हे 6-स्पीड एमटी आणि 6-स्पीड एटी या दोन ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ऑफर केले जात आहेत. 2.0L टर्बो-पेट्रोल (TGDi) इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी 119 kW आणि 330Nm तर स्वयंचलित 130 kW आणि 380 Nm निर्मिती करते. तर दुसरीकडे 2.2L mHawk डिझेल MT/AT साठी 111.9 kW आणि 330Nm टॉर्क निर्माण करते. 4WD प्रकार 128.6 kW आणि 370 Nm निर्मिती करतो.
महिंद्रा थार 4×4 प्रकारांत महिंद्राने अद्याप डिझेल प्रकारांच्या किंमती जाहीर केलेल्या नाहीत. तर पेट्रोल 4×4 प्रकार कंपनीकडून नंतर लाँच केली जाण्याची अपेक्षा आहे. 4×4 डिझेल इंजिन प्रकार (MT आणि AT) MX5, AX5L आणि AX7L प्रकारांमध्ये ऑफर केले जात आहे.