
फोटो सौजन्य: Social Media
भारताबरोबरच अन्य देशात सुद्धा स्टायलिश आणि हाय परफॉर्मन्स असणाऱ्या बाईक्सची क्रेज पाहायला मिळते. आधी एक काळ होता जेव्हा बाईक घेताना तिच्या लूकपेक्षा जास्त लक्ष मायलेजवर दिलं जायचं. पण आजच्या तरुणांना आपल्या बाईकमध्ये हाय परफॉर्मन्ससोबतच आकर्षित लूक सुद्धा हवा आहे. म्हणूनच तर दुचाकी कंपनीज स्टायलिश लूक असणाऱ्या बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. नुकतेच यामाहाने आपली नवीन बाईक मार्केटमध्ये लाँच केली आहे.
Yamaha ने नवीन Yamaha R3 जागतिक स्तरावर लाँच केली आहे. हे लोकप्रिय मॉडेल ब्रँडच्या आधुनिक डिझाईनसह सादर करण्यात आले आहे. ती यामाहाच्या फ्लॅगशिप YZR-M1 रेसिंग बाईकपासून प्रेरित आहे आणि तिच्या डिझाइनमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. Yamaha R3 हे यामाहाच्या R लाइनअपमधील एक मॉडेल होते, जिचे जुने डिझाईन कायमचे बदलले गेले आहे.
हे देखील वाचा: Festive Offers पाहून कार घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे
नवीन Yamaha R3 अमेरिकेत मध्ये तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामाहा ब्लू, मॅट स्टेल्थ ब्लॅक आणि लूनर व्हाइट/नेबुला ब्लू हे तीन रंगांत उपलब्ध आहेत. त्याच वेळी, ते युरोपमध्ये आयकॉन ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक या दोन कलर ऑप्शनमध्ये आणले गेले आहे.
नव्याने अपडेट झालेल्या यामाहा R3 च्या फ्रंट डिझाईनला पुन्हा डिझाइन केले गेले आहे, जे यामाहाच्या R-सिरीजची दमदार स्टाइल दर्शवते. यासोबतच, यात क्वाड-एलिमेंट एलईडी डीआरएलसह एक नवीन सिंगल प्रोजेक्टर हेडलाइट, एलईडी ब्रेक लाईट आणि एलईडी टर्न इंडिकेटरसह शार्प टेल सेक्शन देखील मिळतो.
यामाहा ब्लू मॉडेलमध्ये ब्लू अलॉय व्हील आणि गोल्ड-फिनिश USD फॉर्क्स दिले आहेत. तर उर्वरित दोन व्हेरियंटमध्ये ब्लॅक फिनिश देण्यात आली आहे.
या बाईकमध्ये ब्लू बॅकलाइटिंग, राइड टेलिमेट्री डेटा आणि यामाहाच्या Y-Connect ॲपद्वारे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह नवीन एलसीडी स्क्रीन देखील आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नेव्हिगेशन सपोर्ट दिलेला नाही.
या बाईकची अमेरिकेत किंमत $5,499 ठेवण्यात आली होती, जी भारतात 4.62 लाख रुपये असू शकते. युरोपमध्ये त्याची किंमत अजून जाहीर झालेली नाही. नवीन Yamaha R3 या वर्षी EICMA मध्ये भारतात अनावरण केले जाण्याची अपेक्षा आहे. ते Aprilia RS 457, Kawasaki Ninja 500 आणि KTM RC 390 सारख्या बाईकशी स्पर्धा करते. या बाईकच्या किंमतीत Maruti Alto K10 (रु. 3.99 लाख) खरेदी केली जाऊ शकते.