फोटो सौजन्य: Social Media
देशात अनेक कार्स आहेत ज्या आपल्या परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. या कार्स किफायतीशीर सुद्धा असतात. म्हणूनच तर जास्तीतजास्त ग्राहक या कार्सना पहिले प्राधान्य देताना दिसतात. अशीच एक किफायतीशीर कार म्हणजे मारुती स्विफ्ट.
मारुती स्विफ्ट ही देशातील एक लोकप्रिय कार आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी कंपनीने या कारचे न्यू जनरेशन मार्केटमध्ये आणले होते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि भारतासह अनेक देशांमध्ये या कारची विक्री होत आहे. स्विफ्टची युरो एनसीएपी आणि जपान एनसीएपीच्या माध्यमातून आधीच टेस्ट घेण्यात आली आहे. या दोन्ही क्रॅश टेस्टमध्ये स्विफ्टला 3 आणि 4 स्टार मिळाले होते.
पेट्रोलचे भाव परवडत नाही म्हणून कारमध्ये सीएनजी बसवताय? ‘या’ 5 गोष्टी आताच लक्षात ठेवा
अलीकडे मारुती स्विफ्टची ANCAP (ऑस्ट्रेलियन NCAP) क्रॅश टेस्टिंग झाली आहे. या टेस्टिंगमध्ये कारला फक्त 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. मारुती स्विफ्टला अॅडल्ट, बालक आणि सुरक्षा सहाय्यामध्ये किती गुण मिळाले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. तसेच मारुती स्विफ्ट कोणत्या फीचर्ससह येते याबद्दल सुद्धा माहिती घेऊया.
प्रौढांसाठी घेतलेल्या क्रॅश टेस्टिंगमध्ये या कारला 40 पैकी 18.88 गुण मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियन NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये, चालकाच्या छातीचे संरक्षण कमकुवत असल्याचे आढळून आले. तसेच पायाचे संरक्षण किरकोळ असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर चालक आणि समोरचा प्रवासी या दोघांच्या डोक्याला आणि मानेला चांगले संरक्षण मिळाले आहे. पूर्ण-रुंदीच्या बॅरियर फ्रंट क्रॅश टेस्टिंगमध्ये ड्रायव्हरची सुरक्षा पुरेशी राहिली. तसेच, मागील प्रवाशासाठी डोके आणि मानेचे संरक्षण देखील ठीक होते.
मारुती स्विफ्टची 10 वर्षांच्या मुलाच्या डमीवर क्रॅश टेस्टिंग केली असता, त्याच्या डोक्याचे संरक्षण पुरेसे असल्याचे आढळले, परंतु मानेचे संरक्षण कमकुवत होते तर छातीचे संरक्षण किरकोळ होते.
6 वर्षीय डमीचे डोके आणि मान संरक्षण खूपच खराब असल्याचे आढळले. त्याच वेळी, साइड इफेक्ट टेस्टिंगमध्ये, 6 वर्षांच्या डमीसाठी शरीराच्या सर्व महत्वाच्या अवयवांचे संरक्षण चांगले असल्याचे आढळले आहे.
Kawasaki Ninja बाईक घेण्याची सुवर्णसंधी; कंपनीच्या अनेक मॉडेल्सवर मिळत आहे जबरदस्त सवलत
ऑस्ट्रेलियन-स्पेक स्विफ्ट अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स (ADAS) सह ऑफर केली जाते. यात लेन किप असिस्ट, ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग आणि लेन सपोर्ट सिस्टम आहे. जेव्हा AEB ची कार-टू-कार स्थितीमध्ये टेस्टिंग केली गेली, तेव्हा सिस्टमने जंक्शन आणि क्रॉसिंगवर चांगली कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियात विकल्या जाणाऱ्या मारुती स्विफ्टमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारख्या सेफ्टी फीचर्सचं समावेश आहे. लेव्हल 2 Advanced Driver Assistance System (ADAS) फिचर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विकल्या जाणाऱ्या मारुती स्विफ्टमध्ये देण्यात आले आहे.