MG Hector Tomahawk EV भारतात लाँच! ५१७ किमी रेंज अन् रु. १३.९९ लाखांपासून किंमत सुरु!

JSW MG मोटर इंडियाने भारतीय बाजारात बहुप्रतिक्षित MG हेक्टर टोमाहॉक EV लाँच केली असून, ही हाय-टेक कार एका चार्जमध्ये तब्बल ५१७ किमी धावण्याचा दावा करते. सर्वात रंजक बाब म्हणजे यात घरातील उपकरणांना थेट कारच्या बॅटरीने वीज पुरवणारे विशेष 'व्हिकल-टू-होम' तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
Untitled design (16)
(फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 
  • MG मोटर इंडियाने दमदार ५१७ किमी रेंजसह नवीन अत्याधुनिक 'हेक्टर टोमाहॉक EV' भारतीय बाजारात लाँच केली आहे.

  • बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस (BaaS) पर्यायामुळे या प्रीमियम इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१३.९९ लाख रुपयांपर्यंत खाली येते.

  • कारमध्ये घरातील विजेच्या उपकरणांना थेट पॉवर सप्लाय देणारे भारतातील पहिले 'व्हिकल-टू-होम' (V2H) तंत्रज्ञान समाविष्ट आहे.

JSW MG मोटर इंडियाने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV MG हेक्टर टोमाहॉक EV अधिकृतपणे लाँच केली आहे. या कारच्या ७-सीटर व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ₹१९.४९ लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ग्राहकांसाठी ही कार Excite, Exclusive आणि Essence अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल. तसेच बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस प्रोग्राम अंतर्गत या कारची सुरुवातीची किंमत ₹१३.९९ लाख असणार आहे, ज्यामध्ये ग्राहकांना प्रति किलोमीटर ₹४.९ रुपये बॅटरी भाडे द्यावे लागेल.

दमदार परफॉर्मन्स आणि रेंज

MG हेक्टर टोमाहॉक EV मध्ये ५५.२ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार एका चार्जमध्ये तब्बल ५१७ किमीपर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. यातील इलेक्ट्रिक मोटर २०४ PS पॉवर आणि ३१० Nm टॉर्क जनरेट करते. ही कार ७.४ kW AC चार्जरने किंवा ९० kW DC फास्ट चार्जरने चार्ज करता येते. विशेष म्हणजे, यात 'व्हिकल-टू-होम' तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे कारच्या बॅटरीचा वापर घरातील विजेच्या उपकरणांसाठीही करता येऊ शकतो. भारतामध्ये हे तंत्रज्ञान देणारी ही पहिलीच कार ठरली आहे.

प्रीमियम केबिन आणि फीचर्स

या SUV मध्ये १५.६-इंचाची मोठी HD टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये i-SMART 3.0 कनेक्टेड-कार तंत्रज्ञान, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, MG ॲप स्टोअर, जेन-AI फीचर्स आणि कॅरॅओके सुविधा समाविष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ३६०-डिग्री HD कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये ट्रान्सपरंट शेसिस आणि व्हील व्ह्यूची सुविधा मिळते.

बूट स्पेस आणि डायमेन्शन्स

कारचा व्हीलबेस २,८१० मिमी आहे. ५-सीटर मॉडेलमध्ये ६१० लिटरची बूट स्पेस मिळते, तर ७-सीटर मॉडेलमध्ये तिसरी रांग फोल्ड केल्यावर ५२८ लिटरची जागा उपलब्ध होते. ही कार जागतिक स्तरावर विकल्या जाणाऱ्या वुलिंग स्टारलाइट ५६० वर आधारित आहे.

सुरक्षा आणि ADAS फीचर्स

सुरक्षेसाठी या कारमध्ये लेव्हल-२ ADAS (ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) देण्यात आली आहे. यामध्ये ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, फ्रंट कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि इंटेलिजेंट हेडलॅम्प कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल आणि ABS सह EBD ही फीचर्स देखील मिळतात.

किंमत (एक्स-शोरूम)

  • ७-सीटर एक्साइट: ₹१९.४९ लाख
  • ७-सीटर एक्स्टक्लूसिव्ह: ₹२१.९९ लाख
  • ७-सीटर एसेन्स: ₹२३.४९ लाख
  • ५-सीटर एसेन्स: ₹२२.९९ लाख
  • BaaS प्रोग्राम अंतर्गत: ₹१३.९९ लाख (प्रारंभिक किंमत)

ही सुरुवातीची किंमत मर्यादित गाड्यांसाठी लागू असेल. या कारची टेस्ट ड्राईव्ह आणि डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.