फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राची व्याप्ती ही खूप मोठी आहे. म्हणूनच जगभरातील अनेक ऑटो कंपनीज भारतात आपल्या दमदार कार्स लाँच करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे एमजी मोटर्स. ही ब्रिटन वाहन उत्पादन कंपनी देशात अनेक वर्षांपासून उत्तमोत्तम कार ऑफर करत आहे. इंधनावर चालणाऱ्या कार्ससोबतच आता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर सुद्धा आपले लक्षकेंद्रित करत आहे.
इलेक्ट्रिक कार्सना मिळणारी मागणी पाहता कंपनीने काही इलेक्ट्रिक कार्स देखील भारतात लाँच केल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे MG Windsor EV. या कारमुळे कंपनीच्या विक्रीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नुकताच कंपनीचा नोव्हेंबर 2024 मधील सेल्स रिपोर्ट हाती आला आहे. या रिपोर्टनुसार, कंपनीने किती कार्स विकल्या आहेत, त्यातील सर्वात जास्त विकली जाणारी कार कोणती, आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
Range Rover ची सर्वात स्वस्त कार खरेदी करण्यासाठी किती करावे डाउन पेमेंट? किती असेल EMI?
MG भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये कार आणि SUV ऑफर करत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात एकूण 6019 युनिट्सची विक्री झाली आहे.
माहितीनुसार, कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये 6019 युनिट्स विकल्या आहेत. तर वर्षाच्या आधारे विक्रीत 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या विक्रीत न्यू एनर्जी वेहिकल्सची संख्या सर्वाधिक आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या सेगमेंटमध्ये एकूण कार्सपैकी 70 टक्के कार्सची विक्री केली आहे.
एमजी मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एमजी विंडसर ईव्हीला गेल्या महिन्यातही सर्वाधिक मागणी होती. कंपनीने या इलेक्ट्रिक वाहनाच्या एकूण 3144 युनिट्सची विक्री केली आहे. जे एकूण विक्रीच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे.
Rapido आणि Uber च्या ‘या’ अपडेटेड सेफ्टी फीचर्समुळे महिलांचा प्रवास होईल अधिक सुरक्षित
MG ने काही काळापूर्वी लाँच केलेल्या MG Windsor EV ची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. नोव्हेंबरपूर्वी, ऑक्टोबर 2024 मध्ये देशभरात या कारचे 3116 युनिट्स विकले गेले. ही कार 13.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत ऑफर केली जाते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
एमजी मोटर्स भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहने ऑफर करत आहे. MG Comet EV ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून ऑफर करण्यात आली आहे. याशिवाय MG Windsor EV आणि MG ZS EV इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आणले आहेत. ICE विभागामध्ये, MG MG Astor, MG Hector आणि MG Gloster सारख्या SUV ची विक्री करते. त्यामुळेच कंपनीच्या विक्रीत सातत्याने वाढ होता दिसत आहे.