
फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
भारतातील सणासुदीच्या काळात सर्वच वाहननिर्मिती कंपन्या आपले वाहन लॉंच करत असताना Kawasaki India कडून Vulcan S 2025 आवृत्ती भारतामध्ये लॉंच करण्यात आली आहे. या बाईकमध्ये महत्वाचा बदल समाविशष्ट करण्यात आला आहे तो म्हणजे पर्ल मॅट सेज ग्रीन हा नवीन रंग पर्याय. त्यामुळे ही बाईक आता भारतामध्ये पर्ल मॅट सेज ग्रीन कलर ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे. बाईकच्या यांत्रिक वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
2025 Kawasaki Vulcan S: ची वैशिष्ट्ये
Kawasaki Vulcan S मध्ये क्रूझर सारखी लो-स्लंग स्टेन्स आहे, ज्यामुळे ती अधिक मजबूत आणि आकर्षक दिसते. गोलाकार आकाराचे हेडलॅम्प, ब्लॅक-आउट घटक आणि त्यात असलेले अलॉय व्हील बाईकला आधुनिक आणि आकर्षक लुक देतात. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Vulcan S कंपनीची बाईक 650cc Kawasaki प्रमाणेच मूलभूत वैशिष्ट्ये मिळतात. या बाईकमध्ये सेमी-डिजिटल कन्सोल आहे. यात सिंगल-पॉड हेडलॅम्प, टीयरड्रॉप-आकाराची इंधन टाकी, ब्लॅक फिनिशसह एक्सपोज्ड फ्रेम आणि लो-स्लंग स्टॅन्स आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ड्युअल-चॅनल एबीएस दिला गेला नाही.
2025 Kawasaki Vulcan S बद्दल
Kawasaki Vulcan S 18-इंच फ्रंट आणि 17-इंचाच्या मागील अलॉय व्हील कॉम्बिनेशनवर चालते. बाईकची सस्पेंशन ड्यूटी 41 मिमी आहे, जी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि प्रीलोड-ॲडजस्टेबल रिअर मोनोशॉकद्वारे हाताळण्यात येते. बाईकची मध्ये डिस्क आहेत. बाईकमध्ये 14-लिटरची इंधन टाकी आहे. बाईकचे वजन हे 235 किलो आहे. सीटची उंची 705 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 130 मिमी आहे.
2025 Kawasaki Vulcan S चे इंजिन
कावासाकी बाईकमध्ये 649cc, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 7,500rpm वर 59.9bhp ची कमाल पॉवर आणि 6,600rpm वर 62.4Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन हे सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
2025 Kawasaki Vulcan S: किंमत
Kawasaki Vulcan S ची एक्स-शोरूम किंमत ही 7.10 लाख रुपये आहे. मागील मॉडेल सारखीच या बाईकची किंमत आहे. भारतीय बाजारात Kawasaki Vulcan S ची स्पर्धक बाईक ही Royal Enfield Super Meteor 650 आहे. मात्र या दोन्ही बाईकच्या किंमत आणि फीचर्समध्ये बराच फरक आहे. जर तुमचे बजेट जवळपास 8 लाख रुपये असेल तर 2025 Kawasaki Vulcan S हा पर्याय असू शकतो.