फोटो सौजन्य: Social Media
रतन टाटांचे निधन हे अवघ्या देशासाठी खूप मोठा धक्का होता. ते फक्त एक चांगले उद्योगपती नसून एक चांगली व्यक्ती सुद्धा होते. आज जरी ते आपल्या सोबत नसलेतरी त्यांच्या आयुष्यातील किस्से आज देशवासियांसाठी आयुष्याचे धडे बनले आहे. मग ते टाटा यांचा अपमान करणाऱ्या फोर्ड कंपनीला टाटा समूहाचा भाग बनवणे असो की देशातल्या अल्प उत्पनधारक लोकांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार लाँच करणे असो, या भारताच्या रतनने नेहमीच देशाची मान उंचावली आहे.
रतन टाटा यांनी टाटा मोटर्स आणि इतर कंपनीजला मोठ्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत एक मजबूत पकड निर्माण केली आहे. रतन टाटा याना विविध कार्स खरेदी करण्याचा सुद्धा छंद होता. म्हणूनच आज आपण रतन टाटा यांच्या कार कलेक्शनमधील कार्सबद्दल जाणून घेणार आहोत.
रतन टाटा यांच्या कार कलेक्शनमध्ये एकच नाही तर अनेक आलिशान कार्स आहेत. यापैकी दोन कार्स त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होती. जरी टाटा नॅनोला टाटा मोटर्सच्या उत्पादन लाइनअपमधून काढून टाकण्यात आले असले तरी, रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांच्या गॅरेजमध्ये टाटा नॅनो देखील उभी होती.
हे देखील वाचा: रतन टाटांना Tata Nano बनवण्याची आयडिया नेमकी सुचली तरी कशी? जाणून घ्या
टाटा नॅनो हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट होते, जे कमी उत्पन्न गटातील लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. त्याची किंमत एक लाख रुपये होती. त्याच वेळी, ही जगातील सर्वात स्वस्त कार देखील होती. या छोट्याश्या कारने रतन टाटा यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.
टाटा नॅनोसोबतच 1998 मध्ये लाँच झालेली टाटा इंडिका ही देखील त्यांच्यासाठी खास कार होती. 2023 मध्ये टाटा इंडिकाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त एक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले होते की, टाटा इंडिका ही भारतातील पहिली स्वदेशी कार होती. ही कार त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ असल्याचेही त्यांनी लिहिले आहे.
एका रिपोर्टनुसार, रतन टाटा एकेकाळी होंडा सिविकमध्ये प्रवास करत होते. यानंतर त्यांनी टाटा समूहाच्या टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये प्रवास करण्यास सुरुवात केली. अलीकडच्या काळात टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये चांगलेच वर्चस्व निर्माण आहे.
रतन टाटा यांच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ एसएल५००, मासेराती क्वाट्रोपोर्ट, लँड रोव्हर फ्रीलँडर, कॅडिलॅक एक्सएलआर आणि होंडा सिविक सारख्या कार्सचा देखील समावेश होता.