फोटो सौजन्य: YouTube
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र टाटा मोटर्सशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आजही अनेक नवीन कार खरेदीदार डोळे झाकून टाटाच्या कार्सवर विश्वास ठेवत असतात. याच ग्राहकांच्या विश्वासामुळे टाटा मोटर्स नेहमीच आपल्या कार्समधून ग्राहकांना जास्त फीचर्स तसेच सुरक्षितता देण्याचा प्रयत्न करत असतात. आता कंपनीने आपली सर्वात जास्त लोकप्रिय असणारी कार टॅक्स फ्री केली आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊया.
टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. विक्रीच्या बाबतीत टाटा पंचने स्विफ्ट आणि वॅगनआर सारख्या लोकप्रिय कारलाही मागे टाकले आहे. गेल्या 6 महिन्यांत या कारच्या 1 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. आता टाटा मोटर्सने हे कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट म्हणजेच CSD मध्ये 1 लाख रुपयांच्या कमी किमतीत उपलब्ध करून दिले आहे.
हे देखील वाचा: Toyota च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे 5 लाखांपर्यंचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर
कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंटवरून ही कार खरेदी केल्यास तुम्हाला कमी GST भरावा लागेल. बाजारातील सामान्य ग्राहक कारवर 28% GST भरतात, तेच CSD मध्ये फक्त 14% GST भरावा लागतो. आता तुम्ही हे असे कसे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
टाटा पंच मधील ही ऑफर फक्त CSD साठीच आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणी भारतीय आर्म्ड फोर्स, हवाई दल किंवा नौदलात सेवा करत असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. विशेष बाब म्हणजे आता या कारचे बेस मॉडेल अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे ही कार खरेदी करणाऱ्या लोकांची एक लाख रुपयांहून अधिक पैश्यांची बचत होऊ शकते. या मॉडेलची सुरुवातीची किंमत 6.13 लाख रुपये होती, परंतु आता ती CSD ग्राहकांसाठी करमुक्त असल्यामुळे त्याची किंमत खूपच कमी झाली आहे.
टाटा पंचमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे, जे 86 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. टाटा पंचने मॅन्युअलमध्ये 18.97 kmpl आणि ऑटोमॅटिकमध्ये 18.82 kmpl मायलेजचा दावा केला आहे. या कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि यांसारखे अनेक फीचर्स आहेत.
टाटा पंचने टॉप-10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट डिझाइन आणि जबरदस्त फीचर्समुळे ग्राहकांकडून या कारला पसंत केले जात आहे. ही कार 5-स्टार ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंगसह येते.