फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक कार विकल्या जातात. काही वेळेस तर कंपनीच्या कार्स विक्रीचा उच्चांक गाठताना दिसतात. भारतात अनेक उत्तम कार्स आहेत, ज्या आजही लोकप्रिय आहेत. म्हणूनच तर कंपनी या कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच करत असते. यातीलच एक कार म्हणजे मारुती सुझुकीची स्विफ्ट. अनेक वर्षांपासून ही कार भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक भारतीय ग्राहक नवीन कार खरेदी करण्यासाठी आपली पहिली पसंती मारुती स्विफ्टला देत असतात.
मारुती सुझुकी स्विफ्टला भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच खूप पसंती मिळाली आहे. कंपनीने मे 2024 मध्ये मारुती स्विफ्टची अपडेटेड व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केले होते, ज्याला ग्राहकांकडून सातत्याने उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की लाँचच्या पुढील 6 महिन्यांत म्हणजे जून-नोव्हेंबर 2024 मध्ये नवीन मारुती स्विफ्टला 94000 पेक्षा जास्त ग्राहक मिळाले आहेत. या कालावधीत मारुती स्विफ्टच्या मासिक विक्रीबद्दल आणि त्याच्या फीचर्सबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
9 एअरबॅग्स, अत्याधुनिक फीचर्स आणि महागड्या किंमतीत लाँच झाली नवीन Toyota Camry
जून महिन्यात नवीन मारुती स्विफ्टला एकूण 16,422 ग्राहकांनी खरेदी केले. तर जुलै महिन्यात एकूण 16,854 लोकांनी स्विफ्ट खरेदी केली. याशिवाय ऑगस्ट महिन्यात मारुती स्विफ्टने कारच्या एकूण 12,844 युनिट्सची विक्री केली. तर सप्टेंबर महिन्यात स्विफ्टला एकूण 16,241 नवीन ग्राहक मिळाले. याशिवाय ऑक्टोबरमध्ये एकूण 17,539 लोकांनी नवीन स्विफ्ट खरेदी केली. त्याच वेळी, स्विफ्टला नोव्हेंबरमध्ये एकूण 14,737 ग्राहक मिळाले. जर आपण एकूण विक्रीबद्दल बोललो तर मारुती स्विफ्टला या कालावधीत एकूण 94,637 ग्राहक मिळाले.
जर आपण अपडेट केलेल्या मारुती सुझुकी स्विफ्टच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, त्यात 1.2-लिटर 3-सिलेंडर Z-सीरीज पेट्रोल इंजिन आहे, जे 82bhp ची कमाल पॉवर आणि 112Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. स्विफ्टच्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 24.8 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. तर मारुती स्विफ्टच्या पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंटचे मायलेज 25.75 किलोमीटर प्रति लिटर आहे.
Hyundai कंपनीची मोठी घोषणा; भारतात उभारणार तब्बल 600 EV चार्जिंग स्टेशन्स
अपडेट केलेल्या मारुती स्विफ्टच्या केबिनमध्ये ग्राहकांना 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. याशिवाय, सुरक्षेसाठी, कारमध्ये स्टँडर्ड 6-एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
अपडेटेड मारुती सुझुकी स्विफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी ६.४९ लाख ते ९.६९ लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.