फोटो सौजन्य: YouTube
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या अनेक वाहन उत्पादक कंपनीज इलेक्ट्रिक वाहनं लाँच करताना दिसत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहेत. ज्यामुळे अधिकतर लोकं कार किंवा बाईक घेताना इलेक्ट्रिक व्हेरियंटचा अवलंब करत आहे. यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांना असणारी मागणी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
ओला कंपनी ही अनेक कंपनीजच्या तुलनेत आधीच इलेक्ट्रिक स्कुटर्सची निर्मिती करत आहे. पण यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ओलाने बाईक सेगमेंटमध्ये आपल्या तीन बाईक्स लाँच केल्या आहेत. Ola Roadster Pro असे या बाईकचे नाव असून बाईकचे डिझाइन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ग्राहकांच्या अपेक्षेनुसार ठेवण्यात आले आहेत. बाईकचे स्पेसिफिकेशन्स अतिशय उत्कृष्ट आहेत. चला जाणून घेऊया, ओला रोडस्टर प्रोमधील कोणती गोष्ट या बाईकला विशेष बनवते.
ओला रोडस्टर प्रो दोन बॅटरी पॅकसह येतो, जे 8kWh आणि 16kWh आहेत. ओलाने केलेल्या दाव्यानुसार, रोडस्टर प्रो ही सध्यातरी देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक आहे. ही बाईक, 52kW मोटरसह 16kWh ट्रिममध्ये, 1.9 सेकंदात 0 ते 60kmph वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड 194kmph आहे. Ola च्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 16kWh ची बॅटरी आहे ज्याची रेंज 579km आहे.
ओला रोडस्टर प्रोचे डिझाईन खूपच स्पोर्टी आहे. त्याची डिझाईन अतिशय आकर्षित ठेवण्यात आहे. यात डीआरएल स्ट्रिप किंवा ‘टँक’ विस्तारासह रोबोकॉप स्टाइल हेडलाइट काउल आणि स्लिम टेल सेक्शन आहे. ही बाईक दोन रंगांच्या पर्यायांसह येते, परंतु पुढील वर्षी ही बाईक अधिक रंगांमध्ये आणली जाईल अशी अपेक्षा आहे.
या बाईकमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 10-इंचाचा टचस्क्रीन टीएफटी डिस्प्ले आहे. तसेच हायपर, स्पोर्ट, नॉर्मल आणि इको असे चार राइड मोड आहेत. यासोबतच कंपनी बाईकमध्ये MoveOS सॉफ्टवेअरसह आणखी अनेक फीचर्स समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये व्हीली कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ADAS दिले जातील. जर ADAS यात आले तर ही देशातील पहिली बाईक असेल ज्यात हा फिचर असेल.
या बाईकमध्ये स्टील फ्रेम आहे, ज्याच्या समोर USD फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक आहे. ही ट्यूबलेस टायरसह अलॉय व्हीलवर चालते. त्याच वेळी, ब्रेकिंगसाठी, बाईकच्या पुढील बाजूस ट्विन डिस्क आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही सुरक्षित बाईक चालवू शकता.
ओलाने त्याच्या या बाईकच्या 8kWh प्रकारची किंमत 2 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर, 16kWh वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.5 लाख रुपये आहे.