फोटो सौजन्य: Freepik
सेप्टेंबरचा महिना चालू झाला आहे आणि याच सोबत सणासुदीचा काळ सुद्धा चालू झाला आहे. अशावेळी अनेकजण हे बंपद डिस्कॉउंट्सच्या शोधात असतात. या सणासुदीच्या काळात अनेक जण आपली आवडती कार विकत घेत असतात. तसेच अनेक जण डीलर कडून अतिरिक्त डिस्काउंटची सुद्धा मागणी करताना दिसतात.
जर तुम्हाला सुद्धा या सणासुदीच्या काळात कार विकत घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने डीलर बरोबर बोललात तर सणासुदीच्या काळात कारवर बंपर सवलत मिळवणे अधिक सोपे होऊ शकते. कार खरेदी करताना तुम्हाला आणखी चांगली डील मिळविण्यात मदत करण्यासाठी खाली टिप्स दिल्या आहेत.
हे देखील वाचा: PM E-Drive योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक कारवर नाही मिळणार सबसिडी, जाणून घ्या कारण
सणासुदीच्या काळात जवळपास सर्वच कार कंपनीज आकर्षक ऑफर्स देत असतात. वेबसाइट्स किंवा जाहिरातींद्वारे तुम्ही या ऑफर्सची माहिती आधीच मिळवू शकता. याद्वारे तुम्हाला कळेल की कोणत्या ब्रँड आणि मॉडेलवर किती डिस्काउंट मिळत आहे.
तुम्ही डीलरशिपवर पोहोचल्यावर, सवलत आणि ऑफरबद्दल थेट बोला. सवलतींबद्दल चौकशी करण्यासाठी तुम्ही एकाधिक डीलरशिपला भेट देत आहात हे स्पष्ट करा. यामुळे डीलरला कळेल की तुम्ही फक्त एका जागेवर अवलंबून नाही आहात आणि त्याला तुम्हाला एक चांगली ऑफर द्यावी लागेल.
जर तुमच्याकडे जुनी कार असेल तर तिच्या एक्सचेंज व्हॅल्यूबद्दल विचारा. सणासुदीच्या काळात, अनेक डीलरशिप अतिरिक्त बोनस किंवा एक्स्चेंजवर सूट देतात, ज्यामुळे तुम्हाला कार खरेदी करण्यात खूप मदत होऊ शकते.
जर तुम्ही कार फीनंसिन्गद्वारे खरेदी करत असाल तर कर्जावरील व्याजदर आणि इतर लपविलेल्या फीस बद्दल स्पष्टपणे विचारा. कधीकधी डीलरशिप फायनान्सिंगवर सवलत किंवा चांगले व्याज दर देखील देतात, ज्यामुळे तुमचा EMI कमी होऊ शकतो.
डीलरशिप सहसा कारसोबत फ्लोअर मॅट्स, कार कव्हर्स किंवा म्युझिक सिस्टीम यासारख्या ॲक्सेसरीज देतात. तुम्ही यावर सवलत मागू शकता किंवा त्यांना मोफत देण्याबद्दल बोलू शकता
तुम्हाला आणखी चांगला सौदा हवा असल्यास, महिन्याच्या शेवटच्या दिवसांची किंवा सणासुदीची वाट पहा. डीलरशिपला त्या वेळी त्यांचे टार्गेट पूर्ण करावे लागते आणि ते अधिक चांगल्या सवलती किंवा ऑफर देण्यास तयार होतात.