टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात 19.59 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत दाखल झाली आहे. नवीन मॉडेलमध्ये E85 फ्लेक्स-फ्युएल हायब्रीड इंजिन, 12.3-इंच स्क्रीन आणि 6 एअरबॅग्स मिळतात. नवीन डिझाइन आणि अपडेटेड फीचर्समुळे फॅमिली MPV खरेदीदारांसाठी ही गाडी चर्चेचा विषय ठरणार आहे.
Toyota Innova Hycross Facelift Launched In India
Toyota Innova Hycross Facelift Launched In India (फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 
  • टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 19.59 लाख रुपये.

  • नवीन हायब्रीड मॉडेलमध्ये E20 ते E85 इंधन वापरण्याची सुविधा.

  • 12.3-इंच टचस्क्रीन, डिजिटल डिस्प्ले आणि 6 एअरबॅग्सची साथ.Toyota Innova

Hycross Facelift भारतीय मार्केटमध्ये दाखल झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने या अपडेटेड हायब्रीड MPV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 19.59 लाख रुपये ठेवली आहे. विशेष म्हणजे, या गाडीच्या हायब्रीड व्हर्जनची सुरुवातीची किंमत 19.99 लाख रुपये आहे. नवीन मॉडेलमध्ये बाह्य डिझाइनसह केबिनमध्येही बदल करण्यात आले असून, E85 इथेनॉल मिश्रित फ्युलवर चालण्याची सुविधा हे या गाडीचे सर्वात खास वैशिष्ट्य आहे.

Toyota Innova Hycross Facelift Launched In India
नवीन टोयोटा फॉर्च्युनरचा 1 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू; 2027 मध्ये भारतात एन्ट्री, ADAS टेक्नोलॉजीसह मिळणार नवा अवतार?

E85 फ्युलवर चालणारी हायब्रीड MPV

नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडमध्ये E20 ते E85 पर्यंतच्या पेट्रोल-इथेनॉल मिश्रणाचा वापर करता येणार आहे. E85 इंधनामध्ये 85 टक्क्यांपर्यंत इथेनॉल असते. ऑगस्ट 2023 मध्ये टोयोटाने या गाडीचा फ्लेक्स-फ्युएल प्रोटोटाइप दाखवला होता. आता कंपनीने प्रोडक्शन मॉडेलला भारतातील पहिली फ्लेक्स-फ्युएल हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणून सादर केले आहे.

हायब्रीड व्हर्जन G, GX, VX आणि ZX अशा व्हेरिएंटमध्ये मिळेल. याशिवाय पेट्रोल इंजिनसह GX व्हेरिएंटचाही ऑप्शन कायम ठेवण्यात आला आहे. पेट्रोल GX ची किंमत 19.59 लाख रुपये, तर हायब्रीड G ची किंमत 19.99 लाख रुपये आहे. हायब्रीड GX, VX आणि ZX साठी अनुक्रमे 23.99 लाख, 28.79 लाख आणि 31.99 लाख रुपये द्यावे लागतील.

केबिनमध्ये मोठी स्क्रीन आणि नवीन फिनिश

नवीन मॉडेलच्या केबिनमध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही 12.3-इंचाचा आहे. मागच्या प्रवाशांसाठी टेबलची रचना बदलण्यात आली असून, डोअर पॅनलवर पियानो ब्लॅक फिनिश, ब्राऊन ट्रिम आणि मेटॅलिक अॅक्सेंट देण्यात आले आहेत.

Toyota Innova Hycross Facelift Launched In India
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्टमध्ये 5 नवीन बदल! डिजिटल डिस्प्ले आणि डॅशकॅमची चर्चा

नवीन फ्रंट डिझाइन आणि सेफ्टी फीचर्स

समोरच्या बाजूला नवीन अँग्युलर ग्रिल, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि स्लिम डे-टाइम रनिंग लाइट्स मिळतात. मागच्या बाजूला दोन स्तरांमध्ये LED टेललॅम्प देण्यात आले आहेत.

इंजिनमध्ये 1,987 cc पेट्रोल युनिट कायम आहे. हायब्रीड व्हर्जनमध्ये इलेक्ट्रिक मोटरसह एकत्रित 186 PS पॉवर आणि 206 Nm टॉर्क मिळतो. टोयोटा सेफ्टी सेन्समध्ये डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, प्री-कोलिजन सिस्टीम, लेन ट्रेस असिस्ट आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांचा समावेश आहे. याशिवाय 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

सुपर व्हाइट, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, सिल्व्हर मेटॅलिक, अॅटिट्यूड ब्लॅक मिका आणि ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक अशा रंगांमध्ये ही MPV मिळेल. त्यामुळे फॅमिली कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी नवीन इनोव्हा हायक्रॉस हा एक महत्त्वाचा ऑप्शन ठरू शकतो.