फोटो सौजन्य: Social Media
TKM च्या इनोव्हा हायक्रॉस ZX आणि ZX(O) मॉडेल्स मार्केटमध्ये चांगल्याच चालत होत्या. परंतु काही कारणास्तव, या कारचे तात्पुरते उतपादन थांबवण्यात आले होते. या काळात, हायब्रिड आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारच्या इनोव्हा हायक्रॉसचे उत्पादन अविरतपणे चालू राहिले. आता पुन्हा हे मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
या घोषणेवर भाष्य करताना, टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या विक्री सेवा वापरलेल्या कार व्यवसायाचे उपाध्यक्ष साबरी मनोहर म्हणाले, “इनोव्हा हायक्रॉस, झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) च्या टॉप-एंड ग्रेडसाठी 1 ऑगस्ट 2024 पासून बुकिंग पुन्हा सुरू करण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादन पर्याय उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी यातून दिसून येते. इनोव्हा हायक्रॉस हे अत्यंत मागणी असलेले मॉडेल बनले आहे.
या कारच्या तात्पुरत्या निलंबनाच्या कालावधीत आमच्या विश्वासू ग्राहकांच्या संयमाची आम्ही प्रशंसा करतो आणि त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. इनोव्हा हायक्रॉस टॉप-एंड ग्रेडसाठी बुकिंग पुन्हा सुरू केल्याने ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक समृद्ध होईल आणि आमच्या ग्राहकांच्या मोबिलिटी आकांक्षा पूर्ण होतील, असा आम्हाला विश्वास आहे.
इंजिन
या कारमध्ये टीएनजीए 2.0-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि ई-ड्राइव्ह सिक्वेन्शिअल शिफ्टसह मोनोकोक फ्रेम आहे, जे जास्तीत जास्त 137 किलोवॅट (186 पीएस) पॉवर आउटपुट देते. ही वेगवान गती आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम इंधन बचत प्रदान करते, ज्यामुळे इनोव्हा हायक्रॉस उद्याच्या हरित वातावरणासाठी एक चांगला पर्याय बनते.
सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेरिएंट [एसएचईव्ही] तसेच गॅसोलीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेली इनोव्हा हायक्रॉस ही ग्लॅमर, प्रगत तंत्रज्ञान, आरामदायी, सुरक्षा फीचर्स आणि ड्रायव्हिंगच्या ऍडव्हेंचरसाठी प्रसिद्ध आहे.
कौटुंबिक गरजांसाठी डिझाइन केलेली, वैशिष्ट्यपूर्ण इनोव्हा हायक्रॉस ग्लॅमर, टिकाऊपणा, कंफर्ट, सुरक्षितता आणि एडव्हान्स तंत्रज्ञान प्रदान करते. टोयोटाच्या समृद्ध जागतिक एस. यू. व्ही. वारशापासून प्रेरणा घेत, इनोव्हा हायक्रॉसमध्ये सर्वांसाठी कंफर्टटेबल आसन व्यवस्था देण्यात आली आहे. ही एक अष्टपैलू गाडी आहे
ज्यांना ही कार विकत घ्यायची असेल, त्यांनी www.toyotabharat.com या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टोयोटा डीलरशिपला भेट देऊ शकतात.