गाडी चालवताना चूक झाल्यास पोलीस गाडी जप्त करू शकतात का? जाणून घ्या हक्क आणि वाहन सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया

रस्त्यावर गाडी चालवताना वाहन चालकांकडून चूक झाल्यास मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक पोलिसांकडून गाडी जप्त केली जाऊ शकते. चला तर जाणून घेऊया गाडी जप्त केल्यानंतर सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया.
जाणून घ्या हक्क आणि वाहन सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया
जाणून घ्या हक्क आणि वाहन सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया
Published on: 
Updated on: 

गाडी चालवताना चालकांकडून चुका होत असतात. कधी गाडीचा वेग खूप जास्त वाढतो तर काहीवेळा रस्त्यावरील सिग्नल सुद्धा मोडले जातात. चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यास रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीचा अपघात सुद्धा होतो. त्यामुळे गाडीचा वेग मर्यादित असणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक पोलिसांना रस्त्यावरील सुरक्षितता राखण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक अधिकार दिलेले असतात. या अधिकारांनुसार वाहतूक पोलीस वाहने जप्त करू शकतात. पण काहीवेळा पोलिसांना दिलेल्या अधिकाराचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. त्यामुळे वाहतूक पोलीस आपली वाहने कधी जप्त करू शकतात? जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

जाणून घ्या हक्क आणि वाहन सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया
EV प्रेमींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीत Hyundai आणि Tata च्या नव्या Car'sची प्रतीक्षा संपणार

कोणत्या नियमानुसार वाहन जप्त केले जाते?

मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम २०७, वाहतूक पोलिसांना किंवा अधिकृत परिवहन अधिकाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास जागेवर वाहन जप्त करण्याची परवानगी आहे. जर चालकाकडे वाहनाचे आरसी किंवा वैध परवाना नसेल आणि ती संबंधित कागदपत्र घटनास्थळी दाखवत नसेल तर वाहतूक पोलिसांकडून वाहन जप्त केले जाऊ शकते. चालकाकडे परवाना नसेल किंवा वाहन चालवणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास वाहने जप्त केली जातात. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार, जर एखादी व्यक्ती दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडली गेली तर पोलीस संबंधित व्यक्तीकडे सर्व कागदपत्र आणि गाडी जप्त करू शकतात.

वाहनाला नोंदणी क्रमांक नसेल, नंबर प्लेटमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड केली असेल किंवा बेकायदेशीर नंबर प्लेट लावली असल्यास वाहन जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. अत्याधिक वेगाने वाहन चालवल्यास, बेदरकारपणे वाहन चालवल्यास किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारे वाहन चालवल्यास, पोलीस कलम 184 अन्वये वाहन जप्त करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करू शकतात. परवान्याशिवाय व्यावसायिक वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त भार उचलणे किंवा विहित मर्यादेपलीकडे प्रवासी वाहून नेणे आणि परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणे, यामुळे गाडी जप्त होऊ शकते.

वाहन जप्त करण्याची प्रक्रिया काय आहे?

वाहन ताब्यात घेण्याआधी पोलीस अधिकाऱ्याने एक अधिकृत पावती किंवा जप्ती ज्ञापन तयार करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक, इंजिन/चेसिस क्रमांक, जप्तीचे कारण, वेळ, ठिकाण आणि त्यातील वस्तूंचा तपशील इत्यादी सर्व माहिती नमूद केलेली असते. जप्त केलेले वाहन जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वाहतूक पोलिसांच्या नियुक्त आवारात सुरक्षितपणे नेऊन उभे केले जाते.

जप्त केलेले वाहन सोडवून घेण्यासाठी काय करावे?

वाहन जप्त झाल्यानंतर पोलिसांनी दिलेली पावती जपून ठेवणे आवश्यक आहे. केवळ जागेवर दंड आकारण्यापुरते मर्यादित न राहता, व्हर्च्युअल कोर्ट किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टात जाते. परिवहन पोर्टलवर तुमच्या वाहनाच्या चलनाची स्थिती तुम्ही ऑनलाईन सुद्धा तपासू शकता. वाहन सोडवून घेण्यासाठी, वाहन मालकाला चलनाची प्रत, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), वाहन चालविण्याचा परवाना, वैध विमा पॉलिसी, PUC प्रमाणपत्र आणि मालकाच्या ओळखपत्राची छायाप्रत तयार ठेवावी लागते. यामुळे वाहन सोडवताना खूप जास्त मदत होते.

जाणून घ्या हक्क आणि वाहन सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया
JSW Combat SUV: पैसे असूनही खरेदी करता येणार नाही ही SUV! फक्त 500 ग्राहकांसाठी खास नियम

संबंधित न्यायालयात जाऊन दंडाधिकारी किंवा स्थानिक वकिलासमोर आपली कागदपत्रे सादर करावी लागतात. काही कागदपत्रे अपूर्ण असतील, तर ती तयार करून न्यायालयात सादर करण्यास सांगितली जातात. दंडाधिकारी गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार दंडाची रक्कम ठरवतील. दंड भरल्यानंतर, न्यायालय सुटकेचा आदेश जारी केल्यानंतर न्यायालयाचा सुटका आदेश, दंडाची पावती आणि तुमची कागदपत्रे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये किंवा तुमचे वाहन जिथे पार्क केले आहे तिथे जाऊन ते सबमिट करावे लागते. कागदपत्रांची आणि न्यायालयाच्या आदेशाची पडताळणी केल्यानंतर त्यावर सही करून नंतरच गाडी मिळते.