फोटो सौजन्य: Freepik
कुठलाही लाँग विकेंड आला की अनेक बाईकस्वार आपल्या बाइक्स घेऊन भटकंती करण्यास सज्ज होतात. त्यातही जर लाँग ड्राईव्ह असेल तर मज्जाच मज्जा. पण अनेक वेळा बाईक चालवताना आपल्याला थांगपत्ता सुद्धा लागत नाही की आपल्या बाईकचे पेट्रोल संपायला आले आहे. अशावेळी जर जवळपास पेट्रोल पंप नसेल तर आपली चांगलीच पंचायत होऊ शकते.
जर तुमच्या बाईकमधील पेट्रोल संपले असेल आणि जवळपास पेट्रोल पंप नसेल तर तुम्ही काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही तुमची बाईक अजून काही वेळ चालवू शकता. चला या सिंपल ट्रिक्स बद्दल जाणून घेऊया.
बहुतेक बाईकमध्ये इंजिनच्या वरच्या बाजूला चोकचा पर्याय दिला जातो. या चोकमध्ये थोडेसे पेट्रोल शिल्लक असते जे तुमच्या बाईकला अनेक किलोमीटरपर्यंत नेऊ शकते. बाईक थांबताच तुम्हाला चोक चालू करावा लागेल. यानंतर, जसे इंजिनमध्ये पेट्रोल जाईल तसे तुम्ही तुमची बाईक सुरू करू शकता. परंतु त्यात काही मिलीलीटर इतकेच पेट्रोल असेल.
हे देखील वाचा: बजाज आणणार इथेनॉल इंधन युक्त बाईक, थ्री व्हीलर्स ! पुढील महिन्यात करणार प्रदर्शन
जर पेट्रोल संपल्यानंतर बाईकचे इंजिन बंद झाले असेल, तर तुम्ही गिअर शिफ्टिंगचा योग्य वापर करून बाईकला चालवू शकता. बाईकला पहिल्या गिअरवर आणून चालवण्यास सुरुवात करा आणि हळूहळू तिला तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरमध्ये शिफ्ट करा. यामुळे बाईकला धक्का देणे सोपे होईल आणि ती जास्त अंतरापर्यंत चालवली जाईल.
तुमच्या बाईकमध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट फीचर असल्यास, ते बटण वारंवार दाबल्याने काहीवेळा थोडेसे पेट्रोल शिल्लक राहते ज्यामुळे इंजिन थोड्या वेळासाठी सुरू होण्यास मदत होते. याच्या मदतीने तुम्ही पेट्रोल पूर्णपणे संपेपर्यंत थोड्या अंतरासाठी बाईक चालवू शकता.
हल्लीच्या काही बाईकमध्ये फ्रीव्हील मोडचा पर्याय उपलब्ध असतो, जो तुमचे पेट्रोल संपल्यास तुम्ही वापरू शकता. या मोडमध्ये बाईक इंजिनच्या मदतीशिवायही बाईक हळू हळू चालवली जाऊ शकते, जे विशेषतः उतार असलेल्या भागात उपयुक्त आहे.
शेवटचा उपाय म्हणून, तुम्ही तुमच्यासोबत नेहमी एक छोटीशी बॉटल ठेवा. ज्यात तुम्ही थोडे पेट्रोल स्टोर करू शकता. याचा उपयोग तुम्ही तुमच्या बाईकमधील पेट्रोल संपल्यावर करू शकता.