फोटो सौजन्य: Social Media
2024 मध्ये अनेक उत्तम दुचाकी आपण पहिल्या आहेत. पण 2024 कोणी गाजवलं असेल तर बजाजच्या सीएनजी बाईकने. जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मार्केटमध्ये आणून बजाजने संपूर्ण मार्केट गाजवलं होतं. ही बाईक लाँच झाल्यावर त्याच्या विक्रीत सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. भारतीय ग्राहक या त्याच्या फीचर्स आणि मायलेजकडे पाहून ही बाईक खरेदी करत आहे. पण आता या बाईकला टक्कर देत मार्केटमध्ये लवकरच CNG स्कूटर येणार आहे.
Bajaj Freedom 125 मार्केटमध्ये लाँच झाल्यापासून अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या CNG टू व्हीलर्स आणायच्या तयारीत आहे. हेच उदाहरण आज भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये पाहायला मिळालं, जिथे CNG scooter ची पहिली झलक पाहायला मिळाली.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये Honda Activa e आणि QC1 च्या किंमती जाहीर
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये, टीव्हीएसने जगातील पहिल्या सीएनजी स्कूटरचे अनावरण केले. TVS Jupiter CNG मॉडेल सध्या फक्त एक कंसेप्ट मॉडेल आहे, परंतु जर अहवालांवर विश्वास ठेवला तर कंपनी लवकरच ही स्कूटर ग्राहकांसाठी लाँच करू शकते.
केवळ सीएनजीवरच नाही तर टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी मॉडेल देखील बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईकप्रमाणेच पेट्रोलवर धावणार आहे. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, या सीएनजी स्कूटरची रचना १२५ सीसी पेट्रोल मॉडेलसारखीच आहे. या स्कूटरमध्ये १.४ किलो सीएनजी टँकसह २ लिटर पेट्रोल टँक देखील असेल.
रिपोर्ट्सनुसार, या सीएनजी स्कूटरच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एक किलो सीएनजीमध्ये ८४ किमी पर्यंत मायलेज देईल. एकदा टाकी भरली की, ही स्कूटर एकूण २२६ किलोमीटर धावेल. या स्कूटरमध्ये OBD2B कंप्लायंट इंजिन आहे, जे 5.3bhp पॉवर आणि 9.4Nm टॉर्क जनरेट करते.
Kia Seltos चा बेस व्हेरियंट, 2 लाखाचे डाउन पेमेंट आणि फक्त भरा दरमहा ‘एवढा’ EMI
या सीएनजी स्कूटरची किंमतीबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पण ही स्कूटर नक्कीच कंपनी बजेट फ्रेंडली किंमतीत आणेल अशी आशा आहे. सध्या टीव्हीएस ज्युपिटरच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत ८८,१७४ रुपये (एक्स-शोरूम) ते ९९,०१५ रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. अशा परिस्थितीत, सीएनजी स्कूटरची किंमत ९० हजार (एक्स-शोरूम) ते ९९ हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत असू शकते अशी अपेक्षा आहे.
ज्युपिटरच्या सीएनजी मॉडेलमध्ये काही स्मार्ट फीचर्स समाविष्ट केले जाऊ शकतात. जसे की फोन चार्ज करण्यासाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट दिला जाऊ शकतो. याशिवाय, स्टँड कट ऑफ सेफ्टी सिस्टम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सपोर्ट उपलब्ध असू शकतो. लक्षात ठेवा की सीएनजी टँकमुळे स्कूटरवरील बूट स्पेस कमी असू शकतो.