फोटो सौजन्य: Freepik
भारतात नेहमीच बाईकपेक्षा स्कुटर्सलाच जास्त पसंती मिळत आहे. याचे कारण म्हणेज बहुतांश दुचाकीस्वार यांना कमी अंतरात सोपी आणि सोयीस्कर वाहन हवे असते जे त्यांना स्कुटरच्या रूपात मिळते. बाईक चालवताना आपल्याला सतत त्याचे गिअर्स बदलावे लागतात. त्याच वेळी स्कुटर चालवताना तुम्हाला हे असे काही करावे लागत नाही. याच कारणामुळे भारतात अॅक्टिव्हा आणि ज्युपिटर सारख्या स्कुटर्स लोकप्रिय आहेत.
आता नुकतेच दुचाकी उत्पादक TVS ने एंट्री लेव्हल स्कूटर सेगमेंटमध्ये TVS Jupiter 110 लाँच केले आहे. या स्कूटरमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला या नवीन स्कुटरबद्दल अधिक जाणून घेऊया.
टीव्हीएसने नवीन ज्युपिटर 110 बाजारात आणली आहे. या स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात अधिक पॉवरफुल इंजिन सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे. ही स्कूटर चार प्रकार आणि सहा रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन नवीन रंगांचाही समावेश आहे.
TVS Jupiter 110 मध्ये कंपनीने 113.3 cc सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. स्कूटरमध्ये फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानासोबत स्पार्क इग्निशनही देण्यात आले आहे. या स्कुटरला 113.3 cc इंजिनमधून 5.9 kW पॉवर आणि 9.8 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. त्याचा टॉप स्पीड 82 किलोमीटर प्रति तास इतका असून त्याला CVT तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
TVS च्या नवीन ज्युपिटर 110 ची लांबी 1848 मिमी, रुंदी 665 मिमी, उंची 1158 मिमी ठेवण्यात आली आहे. याचा व्हीलबेस 1275 मिमी आहे आणि सीटची लांबी 756 मिमी आहे. पेट्रोलसह ता स्कुटरचे एकूण वजन 105 किलो आहे.
नवीन ज्युपिटर 110 मध्ये 12 इंच टायर तसेच स्टील रिम्स आणि अलॉय व्हीलचा पर्याय आहे. यात समोर 220 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 mm ड्रम ब्रेक आहे. यामध्ये इन्फिनिटी एलईडी लाईट्स , एलईडी लाईट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फाइंड माय व्हेईकल, व्हॉईस असिस्ट, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, 33 लीटर अंडरसीट स्टोरेज, आणि अशा कैक फीचर्स तुम्हाला या स्कुटर मध्ये पाहायला मिळेल.
किंमत किती?
नवीन ज्युपिटर 110 लाँच झाल्यानंतर कंपनीने या नवीन स्कुटरची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार या स्कुटरची किंमत किंमत 73700 रुपये आहे.