फोटो सौजन्य: Freepik
कार विकत घेण्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तिचा सांभाळ करणे. आणि हीच गोष्ट कित्येकांना नीट जमत नसते. जर तुम्ही सुद्धा एक कार मालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या इंजिनचे आयुष्य दुप्पट होईल.
आपली कार एकदा का जुनी व्हायला लागली की तिच्यात अनेक समस्या दिसू लागतात. वास्तविक, रोज काही छोट्या चुका आपल्याकडून रोज होत असतात, ज्यांची माहिती अनेकांना नसते.याचा परिणाम काही काळानंतर कारवर होतो. यातील एक म्हणजे तुम्ही सकाळी कार सुरू करताच ती लगेच चालवू लागता. या दरम्यान, जर तुम्ही कारला फक्त 40 सेकंद दिले तर त्याच्या इंजिनमधील समस्या सुमारे 90 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.
हे देखील वाचा: August 2024 मध्ये कोणत्या लक्झरी कारने विक्रीत मारली बाजी, जाणून घ्या
सकाळी कार सुरू केल्यानंतर, ती आइडलिंग असणे आवश्यक आहे. Idling म्हणजे कारचे इंजिन चालू असणे पण कार पुढे न जाणे. जर तुम्ही कार रात्रभर अशीच उभी राहिल्यास तिचे इंजिन ऑइल एका जागी जमा होते. जेव्हा तुम्ही तुमची कार सुरू करता तेव्हा ती काही काळ आइडलिंग करा. असे केल्याने इंजिनचे ऑइल कारच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचते. आइडलिंगमुळे इंजिनचे लुब्रिकेशन होते.
त्याच वेळी, जेव्हा इंजिन योग्यरित्या लुब्रिकेशन केले जात नाही, तेव्हा कारमधील अंतर्गत भाग झिजतात, ज्यामुळे इंजिनचे आयुष्य कमी होते.
कारच्या इंजिनचे व्यवस्थितपणे लुब्रिकेशन झाले आहे की नाही, याची माहिती तुम्हाला RPM मीटरवर मिळेल. तुम्ही कार सुरू करता तेव्हा, RPM मीटरची सुई सुमारे 1000 RPM राहते. यावेळी तुम्हाला कार गिअरमध्ये ठेवण्याची गरज नाही. कार सुरू केल्यानंतर, तुम्हाला RPM 1000 च्या खाली येण्याची वाट पहावी लागेल. काही सेकंदात वाहनाचा RPM 700-800 च्या दरम्यान येईल. यानंतर तुम्ही कार गिअरमध्ये लावू शकता आणि ती चालवू शकता.
जर तुमची कार पार्किंगमध्ये बराच वेळ उभी असेल आणि लवकरच तुम्ही ती चालवणार आहात. तर अशावेळी, आपण वरील नियमाचे पालन केले पाहिजे. यामुळे, इंजिनचे लुब्रिकेशन योग्य राहते आणि त्याचे पार्ट्स देखील खराब होत नाहीत.