फोटो सौजन्य: Freepik
आपण सर्वेच जण आपल्या कार आणि बाइकची पेट्रोल भरायला जात असतो. अशावेळी जशी आपली नजर पेट्रोल भरणाऱ्या मशीनकडेच असते. एरवी अश्या किती तरी घटना घडत आहेत ज्यात कार आणि बाईकमध्ये बनावट पेट्रोल भरले जात आहे, ज्याची भनक कोणालाच लागत नाही आहे. अशावेळी जर तुमच्या बाईक किंवा कारमध्ये बनावट पेट्रोल गेले तर ते फक्त तुमच्या वाहनाच्या परफॉर्मन्सवर परिणाम करणार नाही तर इंजिनवर सुद्धा त्याचा परिणाम होईल.
अलीकडच्या काळात बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. यापैकी एक पेट्रोल आहे, जे प्रत्येकजण त्यांच्या बाइक आणि कारसाठी वापरात असतो. तुमच्या वाहनाला चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी पेट्रोलचा दर्जा चांगला असणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला अस्सल पेट्रोल कसे ओळखावे याची माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया, घरबसल्या खरे आणि बनावट पेट्रोल कसे ओळखायचे.
हे देखील वाचा: पंतप्रधानांच्या बुलेट प्रूफ गाडीमध्ये असतात अनेक वैशिष्ट्ये; ऐकाल तर चकित व्हाल
पेट्रोलची शुद्धता जाणून घेण्यासाठी तुम्ही फिल्टर पेपर वापरू शकता. त्यावर पेट्रोलचे काही थेंब टाका. यानंतर जर त्या पेपरवर डाग पडल्यास समजून जावा की पेट्रोलमध्ये भेसळ होत आहे. जर तुमच्याकडे फिल्टर पेपर नसेल तर तुम्ही A4 पेपरच्या मदतीनेही पेट्रोलची शुद्धता तपासू शकता.
हा पेपर तुम्हाला एक रुपयात बाजारात सहजपणे मिळू शकतो. त्यावर फिल्टर पेपरप्रमाणे पेट्रोलचे काही थेंब टाका. कागदावर डाग पडल्यास पेट्रोलमध्ये भेसळ आहे असे समजून जावा. जर फिल्टर पेपर व A4 पेपर डागमुक्त राहिला तर असे समजण्यास हरकत नाही की पेट्रोल शुद्ध आहे.
हे देखील वाचा: लॉंचिंगपूर्वी Kia कडून carnival चा टिझर प्रदर्शित, सनरुफ ठरतंय प्रमुख वैशिष्ट्य
तुम्ही हायड्रोमीटर, विशेष थर्मामीटर आणि इतर काही उपकरणांद्वारे पेट्रोलची घनता तपासू शकता. पण या अशा पद्धतीने पेट्रोलची शुद्धता तपासण्याची सुविधा केवळ प्रयोगशाळा किंवा पेट्रोल पंपांवरच उपलब्ध आहे.
शुद्ध पेट्रोलची घनता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने निर्धारित केली आहे, जी 730 ते 800 दरम्यान आहे. पेट्रोल पंपाच्या मशीनवर याबाबत लिहिले असते. जर ही निर्धारित संख्या पेट्रोल मध्ये असेल तर समजून जावा ते शुद्ध आहे. त्याच वेळी, जर पेट्रोलची घनता 800 पेक्षा जास्त असेल तर याचा थेट अर्थ असा होतो की पेट्रोलमध्ये भेसळ झाली आहे.