फोटो सौजन्य: Social Media
स्वतःची कार विकत घेण्याचा क्षण आणि त्यामागचा आनंद हा काही औरच असतो. पूर्वी कार खरेदी करताना अनेक अडचणी यायच्या. पण आज बँकांकडून मिळणाऱ्या कार लोनमुळे आणि EMI सुविधेमुळे अनेक जण आपली ड्रीम कार विकत घेत आहे.
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या उत्तम कार ऑफर करत आहे. यातीलच एक विश्वासाचे नाव म्हणजे किया मोटर्स. सध्या मार्केटमध्ये Kia Seltos ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही सुद्धा ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Maruti Suzuki e Vitara च्या रेंजवर झाले शिक्कामोर्तब, Auto Expo 2025 मध्ये होणार सादर
किया सेल्टोसच्या बेस व्हेरियंट HTE O खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर यानंतर या कारचा EMI किती असेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊयात.
किआ सेल्टोसचा बेस व्हेरियंट म्हणून HTE O देते. या कारच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.13 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केली तर आरटीओला सुमारे 1.19 लाख रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 54 हजार रुपये द्यावे लागतील. यासोबतच, एसयूव्हीसाठी टीसीएस शुल्क म्हणून 11129 रुपये, फास्टॅगसाठी 500 रुपये आणि इतर शुल्कांसाठी 150 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर किया सेल्टोस HTE O ऑन रोड किंमत सुमारे 12.99 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरियंट HTE O खरेदी केले तर बँक फक्त याच्या एक्स-शोरूम किंमतीवर कार फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 10.99 लाख रुपये फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 10.99 लाख रुपये देत असेल, तर पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 17682 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 10.99 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 17682 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला Kia Seltos HTE O साठी सुमारे 3.86 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 16.85 लाख रुपये होईल.
किया सेल्टोस एचटीई ओ ही मध्यम आकाराची एसयूव्ही म्हणून ऑफर केली जाते. कंपनीचे हे वाहन बाजारात थेट महिंद्रा XUV 700, टाटा हॅरियर, एमजी हेक्टर, मारुती ग्रँड विटारा, ह्युंदाई क्रेटा यासारख्या सर्वोत्तम एसयूव्हींशी स्पर्धा करते.