कारच्या डिकीत खालील गोष्टी ठेवणे टाळा (फोटो सौजन्य: iStock)
बॅटरी: चुकूनही कारच्या डिकीत बॅटरी ठेवू नका; उष्णतेमुळे बॅटरीला आग लागू शकते किंवा तिचा मोठा स्फोट होऊ शकतो.
जास्त दबाव असणारे कंटेनर: प्रोपेन, ब्युटेन आणि इतर प्रेशराइज्ड कंटेनर कारच्या डिकीत ठेवू नयेत. उष्णतेच्या संपर्कात आल्यास या कंटेनरचे स्फोट होऊ शकतात.
इलेकट्रोनिक्स उपकरणे: चुकूनही इलेक्ट्रॉनिक उपकरणे कारच्या डिकीत ठेवू नयेत, ज्यात बॅटरी असते. बॅटरीचा वापर करणारे इलेकट्रोनिक उपकरणे डिकीत ठेवणे धोकादायक ठरू शकते.
विस्फोटक गोष्टी: कारच्या डब्यात फटाके, गनपावडर आणि इतर स्फोटक पदार्थ ठेवू नयेत. उष्णतेच्या संपर्कात आल्यावर या पदार्थांचा स्फोट होऊ शकतात.
ज्वलनशील गोष्टी: पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर ज्वलनशील गोष्टीत कारच्या डिकीत ठेवू नयेत. उष्णतेच्या संपर्कात आल्यावर या गोष्टी आग पकडू शकतात.