फोटो सौजन्य: Freepik
मागील काही वर्षांपासून डिझेल कार्सबाबत अनेक देशातील सरकार कडक झाले आहेत . काही देशांनी तर पुढील पाच दहा वर्षात डिझेल कार्स बंद करायचे फर्मानच सोडले आहे. तेच भारत आजही डिझेल कार्सला असणारी मागणी कमी होताना दिसत नाही आहे.
डिझेल कार्सबाबत अनेकदा असे म्हटले जाते की भविष्यात त्यांची विक्री बंद पडू शकते. एका दृष्टीकोनातून हे थोडे फार खरे आहे कारण सरकार इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारची विक्री वाढवण्यासाठी सबसिडी देत आहे. दुसरीकडे, डिझेल कारच्या विक्रीला प्रोत्साहन देणारे कोणतेही सरकारी धोरण नाही. परंतु आजही टाटा, महिंद्रा, ह्युंदाई, टोयोटा आणि किआ समवेत अजून अनेक कार निर्मात्या कंपनीज डिझेल कार्स विकत आहे. या कार्सची विक्री होण्याबाबत दोन प्रमुख कारणे आहेत, जी पुढे नमूद केली आहे.
डिझेल कार्स आजही मार्केटमध्ये टिकून आहेत यातलं पाहिलं कारण म्हणजे पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारचे मायलेज जास्त असते ज्यामुळे ग्राहक आजही डिझेल कार्सला पसंत करतात.
दुसरे कारण म्हणजे जास्त इंजिन पॉवर. डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. त्यामुळेच मोठ्या आणि अवजड वाहनांमध्ये कंपनीज अनेकदा डिझेल इंजिन वापरतात. याशिवाय डिझेल इंजिन अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे आहे.
डिझेल कार्स पॉवरफुल जरी असले तरी पेट्रोल कारच्या तुलनेत ते वातावरण जास्त प्रदूषित करते. यामुळेच सरकार प्रदूषणमुक्त भविष्याच्या दिशेने पावले उचलत आहे. आगामी काळात, हायब्रिड कारवर भर दिला जाऊ शकतो ज्यामध्ये इंधनावर चालणाऱ्या इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर लागली असते. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याशिवाय बायोडिझेलवर चालणाऱ्या कार्सवरही भर दिला जाऊ शकतो. बायोडिझेल हे एक जैवइंधन आहे ज्यामुळे प्रदूषण खूपच कमी होईल.