(फोटो सौजन्य-AI एआय)
सध्या Yamaha R15 M ची एक्स-शोरूम किंमत ₹1.90 लाख ते ₹2.01 लाखांदरम्यान आहे. मर्यादित स्टॉक क्लिअर करण्यासाठी काही डीलरशिपवर या बाईकची बुकिंग अजूनही स्वीकारली जात आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या ऑफीशियल वेबसाइटवर R15 M ऑनलाइन ऑर्डरसाठीही दिसत आहे. त्यामुळे स्टॉक संपेपर्यंत कस्टमर्सना ही बाईक खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
R15 S आणि R15 V4 ची विक्री सुरू राहणार
भारतात Yamaha R15 सध्या S, V4 आणि M अशा तीन प्रमुख व्हेरिएंटमध्ये येते. R15 S ची किंमत ₹1.59 लाख असून त्यात क्विकशिफ्टर मिळत नाही. R15 V4 ची किंमत ₹1.75 लाख ते ₹1.80 लाखांदरम्यान आहे आणि काही व्हेरिएंटमध्ये क्विकशिफ्टरचा ऑप्शन मिळतो. त्यामुळे R15 M बंद झाली तरी R15 S आणि V4 लाइनअपमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.
R2 आणि R15 M मधील किंमतीचा फरक ठरला महत्त्वाचा
Yamaha R2 नुकतीच भारतीय मार्केटमध्ये ₹2.30 लाख ते ₹2.53 लाखांच्या किंमतीत लाँच झाली आहे. त्यामुळे R15 M च्या टॉप व्हेरिएंट आणि R2 च्या बेस व्हेरिएंटमध्ये फक्त ₹29,000 चा फरक राहतो. या कमी किंमत अंतरामुळे एकाच कंपनीच्या दोन फुली-फेयर्ड बाईक्समधील कस्टमर मागणी विभागली जाऊ शकते. त्यामुळे R15 M हटवण्यामागे ही एक महत्त्वाची कारणे असू शकतात.
Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?
R2 मध्ये मिळते दमदार स्पोर्ट्सबाईक टेक्नोलॉजी
Yamaha R2 मध्ये 17-इंच व्हील्स, ट्रॅक्शन कंट्रोल, असिस्ट आणि स्लिपर क्लच, Yamaha Ride Control, Street, Sport आणि Rain राइड मोड्स, 37 mm USD फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल-चॅनेल ABS मिळते. मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये Bi-Directional Quick Shifter देखील आहे.
R2 मध्ये 204cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड फ्युल-इंजेक्टेड इंजिन असून ते 26.1 bhp पॉवर आणि 19.1 Nm टॉर्क देते. बाईकचे कर्ब वजन 149 kg आहे. त्यामुळे R15 M बंद झाल्यास R2 ला Yamaha च्या स्पोर्ट्सबाईक लाइनअपमध्ये जास्त महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.






