10 मिनिटाच्या आयडीयाची कमाल, उभारली तब्बल 3600 कोटींची कंपनी; बनला देशातील सर्वात तरूण अब्जाधीश
तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि काही नवीन करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळते. मात्र, तुमच्या यशामध्ये तुमच्या व्यवसायाच्या कल्पनेचा वाटा हा मोठा असतो. आपल्या अनोख्या कलप्नेनेच्या जोरावर असेच काहीसे करून दाखवले आहे हुरुन रिच लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या कैवल्य वोहरा याने. त्याने आपल्या एका कल्पनेच्या जोरावर तब्बल 3600 कोटीची कंपनी उभी केली आहे. यासोबतच तो आज देशातील सर्वात तरुण अब्जाधिश बनला आहे. आज आपण त्याची यशोगाथा पाहणार आहोत…
पुन्हा सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत स्थान
पहिल्यांदाच भारतातील 300 हून अधिक अब्जाधीशांचा समावेश हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून, भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशाचा मान अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मिळवला आहे. तर, क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा यांनी पुन्हा सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
21 व्या वर्षी उभा केला 3,600 कोटींचा व्यवसाय
क्विक कॉमर्स ॲप झेप्टो हे 2023 मधील पहिले युनिकॉर्न बनले आहे. झेप्टो ॲप हे भारतातील सर्वात जलद ऑनलाइन किराणा माल करणारे वितरण प्लॅटफॉर्म आहे. जे ग्राहकांना काही मिनिटांत ऑनलाइन किराणा माल, फळे, भाज्या, वैयक्तिक काळजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि बरेच काही घरपोच पुरवते. याच झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा, हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी आपल्या कँपनीच्या माध्यमातून 3,600 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला. आपल्या मित्रासोबत सुरू केलेलया या व्यवसायातून त्यांना मोठे यश मिळाले आहे.
हेही वाचा – पेटीएमच्या शेअरमध्ये तब्बल 12 टक्क्यांनी वाढ; ट्विट करत मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
शिक्षणाच्या वयात मनात व्यवसायाचे विचार
झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा यांचा जन्म 2003 मध्ये बेंगळुरू येथे झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबई आणि दुबई येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठी प्रवेश घेतला. ज्या शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवण्याचे ध्येय ठेवलेले असते. त्या वयात कैवल्य याच्या व्यवसायाचा विचार घोळत होता. त्याच्या या विचारांमधून त्याला झेप्टोच्या स्थापनेची कल्पना सुचली. त्यानुसार त्याने उद्योगविश्वात पाऊल ठेवले. २०२० साली त्याने आपला मित्र आदित पालिचा साथीने झेप्टो ॲपची सुरुवात केली.
ऑनलाइन डिलिव्हरीच्या मागणीत लक्षणीय वाढ
झेप्टोची कल्पना कैवल्यला कॉलेजमध्ये शिकत असताना सुचली. ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर मालाची डिलिव्हरी होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागायचे आणि हा प्रश्न त्वरित डिलिव्हरी स्टार्टअपच्या माध्यमातून सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच त्याने झेप्टोची सुरूवात केली. विशेष म्हणजे त्यावेळी देशात कोरोना महामारीचा उद्रेक झाला होता. तेव्हा लोकांच्या घरापर्यंत वस्तूंची त्वरीत डिलिव्हरी देण्यासाठी हा स्टार्टअप सुरू करण्यात आला होता. त्यावेळी ऑनलाइन डिलिव्हरीची मागणी लक्षणीय वाढली होती. ज्याचा फायदा झेप्टोला झाला. किरणामार्ट बंद झाल्यानंतर, कैवल्य आणि आदित यांनी 2021 मध्ये या 10 मिनिटांच्या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना त्यात मोठे यश मिळाले.