पैसे तयार ठेवा! 6 जानेवारीला खुला होणार 'हा' तगडा आयपीओ, वाचा... कितीये किंमत पट्टा!
अमेरिकी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. प्रामुख्याने यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी, सेंट्रल बँकेने आपल्या व्याजदर धोरणात बदल करण्याची वेळ आली आहे. असे विधान केल्यानंतर ही तेजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायाला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सेबीकडे आयपीओसाठी प्रस्ताव सादर
अशातच आता पुढील आठवड्यात दोन तगडे आयपीओ लॉंच होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हीरो मोटर्स कंपनीचा आयपीओ ९०० कोटींचा तर बाजार स्टाइल रिटेल (स्टाईल बाजार) चा १५० कोटींचा आयपीओ बाजारात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. हीरो मोटर्स कंपनीने आपल्या आयपीओसाठी २३ ऑगस्ट रोजी आपल्या आयपीओसाठी बाजार नियामक मंडळ सेबीकडे आपला प्रस्ताव सादर केला आहे.
तर सुप्रसिद्ध दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा राकेश झुनझुनवाला यांनी देखील आपल्या बाजार स्टाइल रिटेल (स्टाईल बाजार) च्या आयपीओसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. या आयपीओचा किंमत पट्टा २७ ऑगस्ट रोजी जारी केला जाण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हीरो मोटर्स कंपनीचा आयपीओ
हीरो मोटर्स कंपनीने 23 ऑगस्ट रोजी सेबीकडे आपल्या प्रस्तावित आयपीओसाठी मसुदा सादर केला आहे. त्यानुसार, कंपनीने बाजार नियामकांसमोर मांडलेल्या प्रस्तावात 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 400 कोटी रुपयांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश असणार आहे. ऑफर फॉर सेलद्वारे, कंपनीच्या प्रवर्तकांना त्यांच्या शेअर्स विक्री करून, कंपनीतील त्यांचे हिस्सा कमी करायचा आहे.
हेही वाचा – घरांच्या किंमती वाढणार की घटणार? पाहा… काय सांगतोय रिअल इस्टेट क्षेत्रातील अहवाल!
स्टाईल बाजारचा आयपीओ
स्टाईल बाजारने आपल्या आयपीओसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा आयपीओ ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत गुंतवणुकदारांसाठी खुला राहण्याची शक्यता आहे. या आयपीओच्या माध्यमातून 148 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहे. तर 1.7 कोटींचे शेअर्स हे ऑफर-फॉर-सेल (OFS) द्वारे गुंतवणुकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात या दोन आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची मोठी संधी असणार आहे.