तंत्रज्ञान स्वीकारातील अंतर भरून काढणे : यशस्वी डिजिटल परिवर्तनासाठीचे 4 टप्पे - एस. वेंकट
सध्याच्या घडीला डिजिटल वर्चस्वाची शर्यत साऱ्या जगभर जोरात सुरू झालेली आहे. जागतिक स्तरावर अनेक कंपन्या एआय, ऑटोमेशन आणि क्लाउड कॉम्प्युटींग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये प्रचंड प्रमाणात निधीची गुंतवणूक करताना दिसत आहेत. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) नुसार, जागतिक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठीचा (डीएक्स) खर्च 2027 पर्यंत 4 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
गार्टनरने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार तब्बल 91 टक्के व्यवसाय आपल्या कामकाजासाठी डिजिटल उपक्रमाच्या विविध स्वरूपात वापर करत आहेत. तर व्यवसायातील वरिष्ठ पातळीवरील 87 टक्के अधिकारी डिजिटलायझेशनला प्राधान्य देत आहेत. गार्टनरचा हा अहवाल धोरणात्मक पातळीवर होत असलेल्या बदलाच्या व्यापकतेवर प्रकाश टाकतो. तथापि, परिणामकारक परिणाम साध्य करण्यासाठी फक्त नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान उपयोजित करण्यापेक्षा आणखी बरेच काही आवश्यक आहे. यशाचे खरे माप वापरकर्त्यांद्वारे स्वीकृती, प्रक्रिया सुधारणा आणि प्रात्यक्षिक आरओआयद्वारे त्यांच्या क्षमतेचा उपयोग करणे हे आहे.
काय आहेत डिजिटल परिवर्तनातील अडथळे
तंत्रज्ञानातील गुंतवणूक ही एखाद्या कंपनीची उत्पादकता वाढवू शकते, नफा वाढवू शकते. तसेच ग्राहक, कर्मचारी आणि भागीदार यांच्यातील प्रतिबद्धता वाढवू शकते. परंतु केवळ तेथील प्रत्येक घटकाने डिजिटल उपायांचा तंतोतंत वापर केला तरच हा परिणाम दिसतो. मॅकेंझीच्या एका अहवाला प्रमाणे, डिजीटल परिवर्तनासाठी राबवविले जात असलेल्या उपक्रमांनी जरी वेग पकडला असला तरी केवळ 30 टक्के डिजिटल परिवर्तने त्यांचे इच्छित परिणाम साध्य करत असतात. हा अहवाल तंत्रज्ञान गुंतवणूक आणि प्रभावी वापरकर्ता स्वीकृती यांच्यातील अंतर अधोरेखित करतो. डिजीटल परिवर्तनाच्या प्रवासात अनेकदा अशा प्रकारचे अडथळे येतात. यात प्रामुख्याने ग्राहक केंद्रितपणाचा अभाव, आराखड्यातील त्रुटी, कर्मचाऱ्यांकडून होणारा विरोध, नेतृत्वाची इतरांशी झालेली अयोग्य जुळणी, कठोर अंमलबजावणी हे प्रमुख अडथळे असतात.
येत्या 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार; टाटा समुहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची घोषणा
दरम्यान, तंत्रज्ञानाच्या स्वीकाराला चालना देणारी चार प्रमुख धोरणे आहेत. यात प्रामुख्याने डिजिटल व्यवहारातील पारदर्शकता आणि एकरुपता, वापरकर्ता केंद्रीत आराखडाः तंत्रज्ञानासाठी व्यक्ती नव्हे तर लोकांसाठी तंत्रज्ञान, कौशल्यातील दरी मिटविणेः यशासाठी मनुष्यबळाला सज्ज करणे, विजयोत्सव आणि चॅम्पियनची निर्मितीः बदलास गती देणे, विजयोत्सव आणि चॅम्पियनची निर्मितीः बदलास गती देणे या धोरणांचा समावेश आहे.
डिजिटल परिवर्तनाची खरी क्षमता उलगडणे
स्वाभाविकत: परिवर्तने हे खूप आव्हानात्मक असतात आणि डिजिटल बदल तर त्याहून अधिक कठीण असते. यशस्वी डिजिटल परिवर्तन हे अनेक प्रमुख घटकांच्या समक्रमित प्रतिसादांवर अवलंबून असतात. तंत्रज्ञानाची रणनीती, कार्यक्रमाची रचना, प्रतिभा किंवा कौशल्यातील दरी, परंपरागत संस्कृती समस्या, नेतृत्व आणि प्रशासन पैलू, विक्रेता व्यवस्थापन, प्रकल्प निधी अथवा बदल व्यवस्थापन असो, निरंतर आणि यशस्वी डिजिटल परिवर्तनाची खात्री बाळगण्यासाठी प्रत्येक संभाव्य जोखीम घटकांना संबोधित करणे आवश्यक आहे.
प्रत्येक जण तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात सामील आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी तसेच या रोमांचक मार्गावर वाटचाल करण्यासाठी ते सुसज्ज आहेत का याची खात्री करण्यासाठी ग्राहक केंद्रीत तसेच तंत्रज्ञान वापरणाऱ्या व्यक्तीच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच सातत्याने शिकण्याची संस्कृती रुजविणे, हे घटक अतिशय महत्वाचे आहे. आणि कित्येक पटीत व्यावसायिक मूल्य परिणाम प्रदान करण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचे सुध्दा आहेत. अशी माहिती प्रॅक्टसचे सह-संस्थापक एस. वेंकट आणि अमित किकाणी (सीएफओ – डोहलर ग्रुपमध्ये अमेरिका) यांनी दिली आहे.