Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Acko चा आर्युविमा क्षेत्रात प्रवेश!सुरु केला फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुअरन्स प्लान, प्लानमध्ये आहेत कमालीची वैशिष्ट्ये

अ‍ॅको टेक या अ‍ॅको (Acko) जनरल इन्शुरन्सच्या पालक कंपनीने अ‍ॅको लाइफ इन्शुरन्स या आपल्या नवीन विभागाची घोषणा केली आहे. याद्वारे त्यांनी नवीन फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुअरन्स प्लान सुरु केला आहे. ज्याचा ग्राहकांना चांगलाच लाभ होणार आहे. जाणून घ्या त्यांच्या या नव्या प्लानबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 12, 2024 | 02:31 PM
Acko चा आर्युविमा क्षेत्रात प्रवेश!सुरु केला फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुअरन्स प्लान, प्लानमध्ये आहेत कमालीची वैशिष्ट्ये
Follow Us
Close
Follow Us:

वाहन व आरोग्य विमा उत्पादनांच्या माध्यमातून सामान्य विमा क्षेत्राच्या चाकोऱ्या मोडल्यानंतर अ‍ॅको टेक या अ‍ॅको (Acko) जनरल इन्शुरन्सच्या पालक कंपनीने अ‍ॅको लाइफ इन्शुरन्स या आपल्या नवीन विभागाची घोषणा केली आहे. याद्वारे क्रांतिकारी फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुरन्स प्लान कंपनीने आणला आहे. अ‍ॅकोचा विमा हा वाजवी दर, सोय आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचा अनुभव देणे यावर आधारित आहे.

Acko च्या फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुरन्स प्लानची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये:

• हे उत्पादन पॉलिसीधारकाला त्याच्या बदलत्या आर्थिक जबाबदाऱ्यांनुसार संरक्षणाची रक्कम वाढवण्याची किंवा कमी करण्याची मुभा देते, जेणेकरून पॉलिसीधारकाला योग्य ते संरक्षण मिळत राहील याची खात्री होते.
• आयुष्यातील उद्दिष्टांनुसार पॉलिसीचा कालावधी बदलण्याची मुभाही हे उत्पादन पॉलिसीधारकांना देते, आयुष्यातील उद्दिष्टांनुसार लघुकालीन संरक्षण घेण्याचे किंवा नंतरच्या वर्षांनाही लागू होईल असे संरक्षण पॉलिसीधारकांना मिळते.
• पॉलिसीधारक आपल्या विशिष्ट गरजांनुसार व आयुष्यातील टप्प्यांनुसार पॉलिसीची आखणी करून घेऊ शकतात, उदाहरणार्थ गंभीर स्वरूपाचा आजार किंवा अपघाती मृत्यू या शक्यता लक्षात घेऊन संरक्षण घेऊ शकतात.
• Acko च्या या योजनेद्वारे डिजिटल विल नावाची एक सुविधा नव्याने देण्यात आली आहे, त्यामुळे ग्राहकाला त्याचे इच्छापत्र सहजगत्या तयार करणे, त्यात बदल करणे आणि ते ऑनलाइन मार्गाने सुरक्षितपणे सेव्ह करून ठेवणे शक्य होणार आहे, जेणेकरून त्याच्या/तिच्या इच्छांना कायदेशीर मान्यता मिळेल आणि त्यांच्या जवळच्या व्यक्ती संरक्षित राहतील.

शिवाय, टर्म लाइफ इन्शुरन्स प्लान अपवादात्मक लवचिकता देऊ करतो, त्यामुळे ग्राहकाला पॉलिसीच्या पॉलिसीच्या मुदतीत कधीही पेआउट पर्याय बदलून घेता येतात. पॉलिसीधारक एकरकमी पेआउट, मासिक हप्ते किंवा वार्षिक हप्ते यांच्यापैकी हवा तो पर्याय निवडू शकतात. दाव्याच्या प्रक्रियेदरम्यानही बदलत्या आर्थिक गरजांनुसार पेआउट्स घेण्याची मुभा ग्राहकांना मिळते.

अ‍ॅको मुदत आयुर्विमा योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या विमा योजनेमध्ये ग्राहकांना गरजेनुसार संरक्षणाची रक्कम किंवा मुदतीत बदल करण्याची लवचिकता आणि संरक्षण पुरवते.

थेट ग्राहकाला डिजिटलकेंद्री अनुभव देण्याचा प्रयत्न

अ‍ॅकोचे संस्थापक वरुण दुआ या योजनेबद्दल म्हणाले, “आयुष्यातील अनिश्चितता आणि ग्राहकांच्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर बदलत जाणाऱ्या गरजा यांची जाणीव अ‍ॅकोला आहे. ग्राहकांनी आयुर्विम्याकडे गुंतवणूकीचे साधन म्हणून न बघता त्यांच्या व कुटुंबियांच्या संरक्षणाचा मार्ग म्हणून बघावे असे आम्हाला वाटते. भविष्यकाळातही आमचा भर पूर्णपणे संरक्षणकेंद्री उत्पादने देण्यावर कायम राहील. आता आम्ही जे उत्पादन बाजारात आणले आहे तशीच मुदत आयुर्विमा उत्पादने बाजारात आणण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू.”

ते पुढे म्हणाले, “अ‍ॅकोच्या तंत्रज्ञानातील कौशल्यांच्या जोरावर विमा उद्योगाला नवीन आकार देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. आम्ही थेट ग्राहकाला डिजिटलकेंद्री अनुभव देण्याचा प्रयत्न करू आणि त्याद्वारे उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करू. ग्राहकांसाठी योग्य असलेली उत्पादने देणे आणि त्यांना अधिक मूल्य व श्रेष्ठ ग्राहक अनुभव पुरवणे आम्ही कायम राखू…

फ्लेग्झी टर्म प्लान केवळ सर्वसमावेशक संरक्षणच देऊ करत नाही, तर ग्राहकांना त्यांच्या बदलत्या गरजांनुसार त्यांचे संरक्षण कस्टमाइझ करण्याची व समायोजित करण्याची मुभा देते. त्यामुळेच हे उत्पादन भविष्यकाळात खऱ्या अर्थाने बाजारपेठेतील ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.”

Web Title: Acko launched flexi term life insurance plan know the features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 02:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.