एएमएआयचा अध्यक्षपदी आदित्य ए. श्रीराम तर प्रशांत जे. महाले यांची उपाध्यक्षपदी निवड (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
डीसीएम श्रीराम लिमिटेडचे , डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर असलेले आदित्य ए. श्रीराम यांची देशातील ३६,००० कोटी रूपयांच्या अल्कली ॲन्ड क्लोरो-विनिल उद्योगाचा ऑगस्ट बॉडीमध्ये अल्कली मॅनिफ़ॅक्चर्स असोसियेश ऑफ़ इंडीया (एएमएआय) चे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरीष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत जे. महाले यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या एएमएआयचा ४८ व्या वार्षिक सामान्य बैठकीमध्ये नवे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला.
कॉर्नेल विद्यापिठातून इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग आणि लंडन बिझनेस स्कूल मधून एमबीए केल्यानंतर आदित्य यांनी समूहाचा विविध उद्योगांमध्ये तसेच महत्वाचा कार्यांमध्ये काम केले. ते सुरक्षित आणि शाश्वत विकासाचे पुरस्कर्ते असून नैतिकतेसह विकास आणि व्यवसायात ईएसजीचा सर्वोत्तम गुणवत्तांची अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर आहे.
प्रशांत महाले यांना ३५ वर्षांचा व्यावसायिक नेतृत्वाचा अनुभव असून तो प्रामुख्याने पेट्रोलियम डाऊन्स्ट्रीम, पेट्रोकेमिकल, क्लोर-अल्कली, स्पेशॅलिटी/बल्क केमिकल्स आणि पल्प आणि पेपर इंडस्ट्रीमधील आहे. रिलायन्समध्ये त्यांनी यशस्वी पद्धतीने व्यवसायाचे नेतृत्व केले आहे, त्यांचाकडे पी ॲन्ड एल ची जबाबदारी आहे, तसेच फ़ीडस्टॉक ऑपरेशन्स आणि स्फ़ियरहेडेड स्ट्रॅटेजिक प्रोक्युअरमेंट आणि कमर्शीयल कॉन्ट्रॅक्ट्सचे देखील काम आहे.
केमिकल इंजिनियरिंग केल्यानंतर, प्रशांत यांनी आयएसबी हैद्राबाद, डार्डेन स्कूल ॲफ़ बिझनेस (वर्जिनिया विद्यापिठ ) आणि एक्सएलआरआय जमशठपूर येथे कार्यकारी अभ्यासक्रमांचा मदतीने आपले नेतृत्व कौशल्य मिळविले. एएमएआय कॉस्टिक सोडा, क्लोरिन, सोडा ॲश, पीव्हीसी, सीपीव्हीसी आणि इतर काही उत्पादनांचे उत्पादन करते ज्यांचा प्रामुख्याने केमिकल उद्योगामध्ये वापर होतो , विविध श्रेणीतील औद्योगिक आणि ग्राहक उपयोगी वस्तूंमध्ये देखील त्यांची गरज भासते. या उद्योगाने मेक इन इंडियाचे ध्येय हाती घेतले असून स्वस्त दरातील आयातींसह येणाऱ्या इतर अडथळ्यांवरती मात करत देशातील बहुतांश गरजा कित्येक काळापासून पूर्ण केल्या आहे.
कॉस्टिक सोडाचे प्रामुख्याने क्षेत्र हे ॲल्युमिनियम प्रोसेसिंग, टेक्स्टाईल, इनॉर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक केमिकल, साबण आणि डिटर्जंट तसेच पल्प आणि पेपर उद्योग आहे तर सोडा ॲशचे प्रमुख क्षेत्र हे काच, साबण आणि डिटर्जंट तसेच सिलिकेट उत्पादन आहे. ऑर्गॅनिक आणि इन-ऑर्गॅनिक केमिकल्स व्यतिरिक्त क्लोरिनचा वापर हा पीव्हीसी, सीपीडबल्यू, क्लोरोमिथेन, पाणी/औद्योगिक सांडपाण्याचा डिसिन्फ़ेक्शनकरता (निर्जंतुकीकरणाकरता) केला जातो.
रासायनिक सुरक्षा प्रशिक्षण देऊन एएमआयए एक महत्वाची भूमिका बजावत आसून, विशेषत: त्यांचे लक्ष्य हे क्लोरिन, सोडियम हायपोक्लोराइट, ब्लिचिंग सोल्युशन/पाऊडर इत्यादी वरती आहे. या रसायनांचा प्रामुख्याने वापर हा निर्जंतुकीकरणाकरता केला जातो, त्यांची हाताळणी करणे धोकादायक असते.