Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात एआय टूल्सचा वाढता प्रभाव, मुंबईतील ५ पैकी ४ रिक्रूटर्स स्मार्टपणे, जलद हायर करण्यासाठी गुंतवतात 70 टक्के बजेट

१० शहरांमधील १,३०० हून अधिक एचआर प्रोफेशनल्‍सकडून प्रतिसादांच्‍या आधारावर लिंक्‍डइनच्‍या इंडिया हायरिंग आरओआय संशोधनामधून निदर्शनास येते की मुंबईतील रिक्रूटर्स ‘जलद हायरिंग'वरून ‘दर्जात्‍मक हायरिंग'ला प्राधान्‍य देत आहेत

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Jun 19, 2025 | 03:35 PM
भारतात एआय टूल्सचा वाढता प्रभाव, मुंबईतील ५ पैकी ४ रिक्रूटर्स स्मार्टपणे, जलद हायर करण्यासाठी गुंतवतात 70 टक्के बजेट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

भारतात एआय टूल्सचा वाढता प्रभाव, मुंबईतील ५ पैकी ४ रिक्रूटर्स स्मार्टपणे, जलद हायर करण्यासाठी गुंतवतात 70 टक्के बजेट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत एआय व नाविन्‍यतेचे प्रमाण प्रबळपणे वाढत आहे आणि शहरातील रिक्रूटमेंट क्षेत्र या ट्रेण्‍डला अधिक प्राधान्‍य देत आहे. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn)च्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की, शहरातील ५ पैकी ४ (८३ टक्‍के) रिक्रूटर्स हायरिंग यशाचा दर वाढवण्‍यासाठी जवळपास ७० टक्‍के बजेट तंत्रज्ञान आणि एआय सारख्‍या टूल्‍समध्‍ये गुंतवत आहेत.

१० शहरांमधील १,३०० हून अधिक एचआर प्रोफेशनल्‍सकडून प्रतिसादांच्‍या आधारावर लिंक्‍डइनच्‍या इंडिया हायरिंग आरओआय संशोधनामधून निदर्शनास येते की मुंबईतील रिक्रूटर्स ‘जलद हायरिंग’वरून ‘दर्जात्‍मक हायरिंग’ला प्राधान्‍य देत आहेत, जेथे यशाचे अव्‍वल मापन म्‍हणून हायरचा दर्जा (६९ टक्‍के) ठरले आहे, ज्‍यानंतर उत्‍पन्‍न प्रति कर्मचारी (६१ टक्‍के) आणि कर्मचारी राखण्‍याचा दर (६० टक्‍के) यांचा क्रमांक आहे. ‘क्‍वॉलिटी टॅलेंट’ची व्‍याख्‍या बदलत आहे, शहरातील ६७ टक्‍के रिक्रूटर्स टॅलेंटचा दर्जा ठरवताना व्‍यावहारिक व हस्‍तांतरणीय कौशल्‍यांना प्राधान्‍य देतात.

ज्वेलरी कंपनी पीएनजीएसच्या ‘रेवा डायमंड ज्वेलरी’ ने ४५० कोटी रुपयांच्या IPO साठी डीआरएचपी केले दाखल

अॅडेको इंडियाचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक सुनिल चेमनकोटील म्‍हणाले, “आम्‍हाला टॅलेंट समूहामध्‍ये, तसेच त्‍यांच्‍या भूमिकांच्‍या स्‍वरूपामध्‍ये मुलभूत बदल होताना दिसत आहे. जॉब फंक्‍शन्‍स बदलण्‍यासह हायब्रिड प्रोफाइल्‍स प्रमाणित होत असताना समकालीन जॉब टायटल्‍स उमेदवारांच्‍या संपूर्ण क्षमता दाखवण्‍यामध्‍ये अक्षम ठरत आहेत. लिंक्‍डइन रिक्रूटर २०२४ सारख्‍या प्रगत टूल्‍ससह आम्‍ही आता महत्त्वपूर्ण कौशल्‍यांमधील पदे ओळखू शकतो, जी महत्त्वाची आहेत. यामुळे आम्‍हाला योग्‍य टॅलेंटचा शोध घेण्‍यास मदत होते, ज्‍यांच्‍याकडे पूर्वी दुर्लक्ष करण्‍यात आले असावे. भारतासारख्‍या डायनॅमिक बाजारपेठेत यासारखी एआय-संचालित माहिती उपयुक्‍त असण्‍यासोबत धोरणात्‍मक फायदा देते.”

टॅलेंटमधील तफावत प्रमुख आव्‍हान

भारतभरात उत्‍पादन (६६ टक्‍के) आणि आयटी व तंत्रज्ञान (६२ टक्‍के) यांसारखी क्षेत्रे टॅलेंटचे मापन करताना कौशल्‍यांना अधिक प्राधान्‍य देतात. पण, उत्‍पादनामधील रिक्रूटर्स म्‍हणतात की टेक्निकल व सॉफ्ट स्किल्‍सचे (६९ टक्‍के) योग्‍य संयोजन असलेले कर्मचारी सापडणे आव्‍हानात्‍मक आहे, तर आयटी व तंत्रज्ञान कंपन्‍यांना दर्जात्‍मक उमेदवार जलदपणे सापडण्‍यासाठी (६९ टक्‍के) आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी)साठी, स्‍थानिक पातळीवर कुशल टॅलेंट हायरिंग करताना मर्यादित प्रशिक्षण संधी (५६ टक्‍के) आणि टॉप टॅलेंटकरिता उच्‍च स्‍पर्धा (५५ टक्‍के) मोठी आव्‍हाने निर्माण करतात.

भारतातील लिंक्‍डइन टॅलेंट सोल्‍यूशन्‍सच्‍या प्रमुख रूची आनंद (Ruchee Anand, Head of LinkedIn Talent Solutions in India) म्‍हणाल्‍या, “भारतातील रिक्रूटर्स आता एआयशी फक्‍त समायोजन करत नाहीत तर एआयचा अवलंब करत आहेत आणि एआयसोबत अर्थपूर्ण व्‍यवसाय प्रभाव घडवून आणत आहेत. मुंबईतील डायनॅमिक व झपाट्याने विकसित होत असलेल्‍या टॅलेंट क्षेत्रात या बदलाची भर पडली आहे. शहरातील रिक्रूटर्सचे लक्ष योग्य प्राधान्यांवर आहे, जसे पदवीपेक्षा कौशल्ये आणि संख्येपेक्षा मूल्य. लिंक्डइनद्वारे ऑफर केलेल्या धोरण आणि सारख्‍या एआय-पॉवर्ड टूल्‍सच्‍या विचारशील संयोजनासह मुंबईतील रिक्रूटर्स अचूकता आणि उद्देशासह यश मिळवण्‍याच्‍या अद्वितीय संधीचा फायदा घेऊ शकतात.”

एआय टूल्‍स कार्यक्षमता वाढवतात, रिक्रूटर्सना धोरणात्‍मक करिअर अडवायजर्स बनण्‍यास मदत करतात

रिक्रूटर्स मॅन्‍युअल टास्‍क्‍स कमी करत आणि उत्‍पादकता वाढवत वेळेची बचत करण्‍यासाठी एआयचा वापर करत आहेत. संशोधनानुसार, मुंबईतील ६५ टक्‍के रिक्रूटर्स एआय-पॉवर्ड स्क्रिनिंग टूल्‍सचा वापर करत आहेत आणि ६२ टक्‍के रिक्रूटर्स जलदपणे हायर करण्‍यासाठी निर्णय घेण्‍यामध्‍ये डेटा विश्‍लेषणाचा फायदा घेत आहेत.

भारतभरात आयटी व तंत्रज्ञान सारखी क्षेत्रे एआय-पॉवर्ड स्क्रिनिंग टूल्‍स (७१ टक्‍के) आणि डेटा विश्‍लेषणाच्‍या (७४ टक्‍के) माध्‍यमातून हायरिंगला गती देत आहेत, असेच ट्रेण्‍ड बँकिंग, वित्तीय सेवा व विमा (६१ टक्‍के, ७१ टक्‍के) आणि उत्‍पादनामध्‍ये (५८ टक्‍के, ६२ टक्‍के) दिसून येत आहेत.

रिक्रूटर्सना मापनीय फायदे दिसून येत आहेत: मुंबईतील ४५ टक्‍के रिक्रूटर्स म्‍हणतात की, एआय कार्यक्षमता वाढवते आणि ४१ टक्‍के रिक्रूटर्स म्‍हणतात की, त्‍यांना वारंवार कराव्‍या लागणाऱ्या कामाचा भार कमी झाल्‍याने भागधारक संलग्‍नता आणि उमेदवार अनुभव अशा महत्त्वपूर्ण क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करण्‍यास मदत होते.

एआयचा अवलंब वाढत असताना मुंबईतील ९२ टक्‍के रिक्रूटर्सना त्‍यांच्‍या पदांमध्‍ये ‘धोरणात्‍मक करिअर सल्‍लागार’ म्‍हणून पदोन्‍नती होण्‍याची अपेक्षा आहे आणि ९४ टक्‍के रिक्रूटर्स उमेदवारांशी अधिक कार्यक्षमपणे संलग्‍न होण्‍यासाठी वैयक्तिकृत कन्‍टेन्‍ट व डेटा माहितीचा वापर करण्‍याची योजना आखत आहेत.

लिंक्‍डइनचे एआय-पॉवर्ड टूल्‍स रिक्रूटर्सना उच्‍च प्रतिसाद दरांसह दर्जेदार उमेदवार जलदपणे हायर करण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.
रिक्रूटर्सवर दर्जाबाबत तडजोड न करता जलदपणे उमेदवारांना हायर करण्‍याचा दबाव वाढत असताना लिंक्‍डइनचे एआय-पॉवर्ड टूल्‍स महत्त्वपूर्ण निष्‍पत्ती देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

‘ही’ रिअल इस्टेट कंपनी आणत आहे १५९० कोटी रुपयांचा आयपीओ, किंमत पट्टा, जीएमपी जाणून घ्या

Web Title: Ai tools are gaining traction in india with 4 out of 5 recruiters in mumbai investing 70 percent of their budget to hire smartly and quickly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Business News
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
1

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
2

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
3

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
4

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.