Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमान प्रवास झालाय स्वस्त, दिवाळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वाचा… विमान भाडे?

दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला विमानाने घरी जायचे असेल. तर अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानाच्या प्रवास भाड्यात सरासरी 20 ते 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता विमान प्रवास करणे स्वस्त झाले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 13, 2024 | 08:02 PM
विमान प्रवास झालाय स्वस्त, दिवाळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वाचा... विमान भाडे?

विमान प्रवास झालाय स्वस्त, दिवाळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वाचा... विमान भाडे?

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीला सर्वचजण आपापल्या घरी जातात. अनेकजण नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून दूर असतात. दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला विमानाने घरी जायचे असेल. तर अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानाच्या प्रवास भाड्यात सरासरी 20 ते 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता विमान प्रवास करणे स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता विमान प्रवास भाड्यात 20 ते 25 टक्क्यांची घसरण झाल्यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

विमान भाडे सरासरी 20-25 टक्क्यांनी घटले

विमान प्रवासात नेमकी घसरण का झाली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका अहवालानुसार, अलीकडेच तेलाच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे विमानाचे प्रवास भाडे कमी झाले आहे. कोणत्या मार्गांवर किती भाडे कमी झाले, याबाबतची माहिती पाहुयात. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सीगोच्या अहवालानुसार, देशांतर्गत मार्गावरील सरासरी विमान भाडे 20-25 टक्क्यांनी घटले आहे. या किमती 30 दिवसांच्या आगाऊ खरेदी तारखेवर आधारित सरासरी एक-मार्ग भाड्यासाठी आहेत. अहवालात 2023 चा कालावधी 10 ते 16 नोव्हेंबर आहे. तर या वर्षी तो 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असा आहे.

हे देखील वाचा – रतन टाटा यांनी झिरोपासून हिरो बनवलेल्या 7 कंपन्या; काहींचा परदेशातही आहे डंका!

कोणत्या मार्गावर किती भाडे झाले कमी?

बंगळुरु-कोलकाता फ्लाइटचे सरासरी विमान भाडे 38 टक्क्यांनी घसरुन 6319 रुपये झाले आहे. जे गेल्या वर्षी 10,195 रुपये होते.

चेन्नई-कोलकाता मार्गावरील तिकिटाची किंमत 8725 रुपयांवरुन 36 टक्क्यांनी घसरून 5604 रुपयांवर आली आहे.

मुंबई-दिल्ली फ्लाइटचे सरासरी विमान भाडे 8788 रुपयांवरुन 5762 रुपयांवर आले आहे. म्हणजे यामध्ये 34 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

दिल्ली-उदयपूर मार्गावरील तिकिटांचे दर 11296 रुपयांवरुन 34 टक्क्यांनी घसरून 7,469 रुपयांवर आले आहेत.

दिल्ली-कोलकाता, हैदराबाद-दिल्ली आणि दिल्ली-श्रीनगर मार्गांवर ही घट 32 टक्के आहे.

नेमकी का झालीये घसरण?

गेल्या वर्षी मर्यादित क्षमतेमुळे दिवाळीच्या आसपास विमान भाड्यात वाढ झाली होती. ज्याचे मुख्य कारण म्हणजे गो फर्स्ट एअरलाइनचे निलंबन आहे. यावर्षी अतिरिक्त क्षमतेची भर पडली आहे. ज्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रमुख मार्गांवरील सरासरी विमान भाडे वार्षिक आधारावर 20-25 टक्क्यांनी घटले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चावर लक्षणीय परिणाम झाला आहे.

Web Title: Airfares are down heavily around diwali this year festive season travel will become cheaper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 08:02 PM

Topics:  

  • Diwali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.