Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲपलची भारतात मोठी झेप; …तोडला 50 वर्षांचा विक्रम, व्यवसायात मोठी वाढ!

भारत ही केवळ 'ॲपल'साठी मोठी बाजारपेठच तर जगाला पुरवठा करणारे एक आघाडीचे केंद्र देखील बनले आहे. कंपनीने आयफोन उत्पादन आणि निर्यातीबाबत मोठा विक्रम केला आहे. जो मागील ५० वर्षातील मोठा विक्रम ठरला आहे. कंपनीची भारतातील उलाढाल तब्बल 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 14, 2024 | 08:03 PM
ॲपलची भारतात मोठी झेप; ...तोडला 50 वर्षांचा विक्रम, व्यवसायात मोठी वाढ!

ॲपलची भारतात मोठी झेप; ...तोडला 50 वर्षांचा विक्रम, व्यवसायात मोठी वाढ!

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा ॲपल ही कंपनी चीनची साथ सोडून, भारतात आली. तेव्हा कुणालाही वाटले नव्हते की अवघ्या काही वर्षांमध्ये ही कंपनी भारतात मोठा विक्रम करेल. गेल्या 50 वर्षात कोणत्याही कंपनीने न केलेला विक्रम ॲपल कंपनीने केला आहे. कंपनीचा विक्रम हा मुख्यतः उत्पादन आणि निर्यातीबाबत आहे. ज्यामुळे आता कंपनीची उलाढाल 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जो मागील ५० वर्षातील मोठा विक्रम आहे.

बनले आघाडीचे पुरवठादार केंद्र

दोन वर्षांपूर्वी चीनमधील कोविड परिस्थितीमुळे ॲपलने आपले धोरण बदलले. आणि कंपनीने भारतात प्रवेश आपले उत्पादन वाढवले. आता भारत ही केवळ ॲपलसाठी मोठी बाजारपेठ बनलेली नाही, तर पुरवठा करणारे एक आघाडीचे केंद्र देखील बनले आहे. आयफोन आणि ॲपलची इतर उत्पादने भारतातून जगातील अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मागील काही वर्षापासून आयफोनच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना बळ! 2029 मध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – आयएमएफ

कंपनीची भारतात 2 लाख कोटींपर्यंत वाढ

त्यामुळेच ॲपल आणि फॉक्सकॉन कंपन्या भारतात सतत आपल्या उत्पादन युनिट्सचा विस्तार करत आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. भारत सरकारची पीएलआय योजनाही या कंपन्यांसाठी खूपच उपयुक्त ठरली आहे. ॲपलच्या भारतातील कामकाजात आर्थिक वर्ष 24 मध्ये 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ज्याची किंमत 2023 या आर्थिक वर्षामध्ये 1.15 लाख कोटी रुपये होती.

का झालीये कंपनीच्या व्यवसायात वाढ?

ही वाढ प्रामुख्याने आयफोन उत्पादन आणि मॅकबुक, आयमॅक, आयपॅड, वॉच आणि एअरपॉड्सच्या देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्यामुळे दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या 50 वर्षात भारतातील सर्व कंपन्यांमध्ये ॲपलच्या उत्पादन आणि निर्यातीत सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. दरम्यान, कंपनीच्या एकूण जागतिक महसुलात भारतीय महसुलाचा वाटा २ टक्के इतका आहे.

केंद्र सरकारने 2020 पासून स्मार्टफोन उत्पादन लिंक्ड-इन्सेंटिव म्हणजेच पीएलआय योजना सुरू केली होती. तेव्हापासून कंपनीची वाढ भारतात दिसून आली. ॲपलने 2021 मध्ये भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले. त्याअगोदर चीनबाहेर कंपनीचे पहिले उत्पादन सुरु होते. भारतात फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनकडूनही आयफोनची निर्मिती केली जात आहे. या कंपन्यांचे मूल्य 2024 च्या आर्थिक वर्षात 1.20 लाख कोटी रुपये आहे.

Web Title: Apple breaks 50 year record in india manufacturing and exporting iphones business reaches rs 2 lakh crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 08:03 PM

Topics:  

  • Apple Company

संबंधित बातम्या

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?
1

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?

200MP कॅमेऱ्याच्या टेस्टिंग प्रक्रियेत व्यस्त आहे Apple, सर्वात पहिले कोणत्या iPhone मध्ये मिळणार अपडेट
2

200MP कॅमेऱ्याच्या टेस्टिंग प्रक्रियेत व्यस्त आहे Apple, सर्वात पहिले कोणत्या iPhone मध्ये मिळणार अपडेट

अमेरिकेच्या नक्की मनात चाललंय तरी काय? राष्ट्राध्यक्ष का करतायेत भारताचा पावलो पावली अपमान
3

अमेरिकेच्या नक्की मनात चाललंय तरी काय? राष्ट्राध्यक्ष का करतायेत भारताचा पावलो पावली अपमान

Donald Trump : भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर…, ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी
4

Donald Trump : भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर…, ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.