Ganesh Chaturthi निमित्त Cafe Akasa तर्फे खास महाराष्ट्रीयन भोजनाची मेजवानी
सप्टेंबर 2026 या संपूर्ण महिन्यात उपलब्ध असलेले हे विशेष भोजन अकासा एअरच्या वेबसाइटवर किंवा मोबाइल अॅपद्वारे आगाऊ बुक करता येणार आहे.
महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्यपरंपरेतील चवींचा आधार घेत, गणेश चतुर्थीच्या उत्सवातून प्रेरणा घेतलेले पारंपरिक, परिचित आणि उत्सवी पदार्थ आता आकाशातील प्रवासातही चाखता येणार आहेत. खमंग आणि गोड पदार्थांचा सुरेख मिलाफ असलेले हे खास भोजन उत्सवाच्या काळातील आपुलकी, उबदारपणा आणि एकोप्याची भावना प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष स्वरूपात तयार करण्यात आले आहे.
वर्षभरात विविध सण-उत्सव आणि खास प्रसंगांच्या निमित्ताने मर्यादित कालावधीसाठी विशेष मेनू सादर करत, कॅफे अकासा प्रवाशांचा विमानातील भोजनाचा अनुभव अधिक समृद्ध करत आहे. हंगामानुसार बदलणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार करण्यात येणाऱ्या या खास मेनूमुळे, प्रत्येक विमान प्रवासात प्रवाशांना काहीतरी नवीन अनुभवण्याची उत्सुकता कायम राहते.
ऑगस्ट 2022 मध्ये विमानसेवा सुरू केल्यापासून अकासा एअर विविध सण-उत्सवांशी संबंधित प्रादेशिक खाद्यपदार्थांचा समावेश असलेले खास भोजन प्रवाशांना उपलब्ध करून देत आहे. मकरसंक्रांत, व्हॅलेंटाईन डे, होळी, ईद, ईस्टर, मदर्स डे, आंतरराष्ट्रीय योग दिन, नवरोज, ओणम, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, बालदिन आणि ख्रिसमस अशा विविध प्रसंगी कॅफे अकासाच्या माध्यमातून खास उत्सवी मेनू सादर केला जातो. याशिवाय, आकाशातील प्रवासात आपल्या प्रियजनांसोबत खास प्रसंग साजरा करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कॅफे अकासाच्या नियमित मेनूमध्ये विविध केक आगाऊ निवडण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
कॅफे अकासाच्या मेनूमध्ये वारंवार बदल करून विविध प्रकारचे दर्जेदार खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि ताजेतवाने पेये समाविष्ट केली जातात. प्रवाशांच्या विविध आहारविषयक गरजा आणि खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हा मेनू विशेष पद्धतीने तयार करण्यात आला आहे.मेनूमध्ये 45 हून अधिक खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये फ्यूजन पदार्थ, प्रादेशिक चवीचा ट्विस्ट असलेले अॅपेटायझर्स आणि स्वादिष्ट डेझर्ट्सचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ भारतातील नामांकित शेफनी विशेष स्वरूपात तयार केले आहेत.






