Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करारो इंडियाचा आयपीओ खुला; गुंतवणूकदारांना करावी लागणार किमान ‘इतकी’ गुंतवणूक

करारो इंडिया कंपनीची स्थापना 1997 साली करण्यात आली असून, ती करारो एस.पी.ए. कंपनीची उपकंपनी आहे. कंपनीने 1999 पासून ट्रान्समिशन सिस्टीम्सचे उत्पादन सुरु केले होते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 21, 2024 | 07:50 AM
करारो इंडियाचा आयपीओ खुला; गुंतवणूकदारांना करावी लागणार किमान 'इतकी' गुंतवणूक

करारो इंडियाचा आयपीओ खुला; गुंतवणूकदारांना करावी लागणार किमान 'इतकी' गुंतवणूक

Follow Us
Close
Follow Us:

करारो इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ शुक्रवारी (ता.20) शेअर बाजारात खुला झाला आहे. कंपनीने या आयपीओसाठी किंमत बँड प्रति शेअर 668 रुपये ते 704 रुपये दरम्यान निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी 24 डिसेंबर पर्यंत बाेली लावता येणार आहे.

करावी लागणार ‘इतकी’ गुंतवणूक

गुंतवणूकदार किमान 21 शेअर्सच्या एका लॉटसाठी व त्यापुढे 21 शेअर्सच्या पटीत बोली लावू शकणार आहेत. तुम्ही 704 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडनुसार 1 लॉटसाठी अर्ज केल्यास तुम्हाला 14,784 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. करारो इंडिया लिमिटेडचा आयपीओ पूर्णत: ऑफर फॉर सेल असून, त्या अंतर्गत करारो इंटरनॅशनल एस. ई. कंपनीने सुमारे 1250 कोटींचे शेअर्स विकले जाणार आहेत.

करारो इंडिया कंपनीची स्थापना 1997 साली करण्यात आली असून, ती करारो एस.पी.ए. कंपनीची उपकंपनी आहे. कंपनीने 1999 पासून ट्रान्समिशन सिस्टीम्सचे उत्पादन सुरु केले होते. नंतर 2000 सालापासून कंपनीने एक्सेल उत्पादन देखील सुरु केले. कंपनीने करारो समुहातील अन्य कंपन्यांकडून आयपी हक्क परवाना प्राप्त करुन आपल्या उत्पादन प्रक्रियेची सुरुवात केली.

करारो समुहातील ही कंपनी ग्राहकांसाठी क्लीस्ट व गुंतागुतीच्या अभियांत्रिकी उत्पादनांची निर्मिती करण्यात तज्ज्ञ व निष्णांत आहे. ही कंपनी स्वतंत्र टायर-1 सेवा पुरवठादार कंपनी आहे. कृषी क्षेत्रात ट्रॅक्टर व बांधकाम उपकरणांतील ट्रान्समिशन सिस्टिम्स व ॲक्सेल निर्मिती हे या कंपनीचे खास वैशिष्ट्य आहे.

सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा… का होतीये बाजाराची घसरगुंडी!

ग्राहकांच्या अंतिम उत्पादनांसाठी कंपनीची ॲक्सेल व ट्रान्समिशन सिस्टीम्स ही अत्यंत महत्वाची उत्पादने आहेत. ग्राहकांच्या अंतिम उत्पादनांमध्ये गियर, शाफ्ट्स, ऑफ हायवे व्‍हेईकल्स, तसेच औद्योगिक व ऑटोमोटीवह वाहनांचा समावेश आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये ॲक्सेल्स व ट्रान्समिशन सिस्टिम्स, कृषी ट्रॅक्टर्स, बांधकाम वाहने, बॅकहो लोडर्स, सॉईल कॉम्पॅक्टर्स, क्रेन्स, सेल्फ लोडींग काँक्रीट मिक्सर्स, आणि स्मॉल मोटर ग्रेडर्स यांचा समावेश आहे.

करारो समूह कंपनी कृषी ट्रॅक्टर्ससाठी ॲक्सेल्स व ट्रान्समिशन सिस्टिम्स पुरवणारी भारतातील स्वतंत्र टायर-1 पुरवठादार कंपनी आहे. कंपनीने 150 एचपी ट्रॅक्टर्स व फोर व्‍हील ड्राईव्‍ह वाहनांसाठी ट्रान्समिशन सिस्टीम्स पुरणारी बाजारपेठेतील पहिल्या क्रमांकाची कंपनी अशी स्वताची ओळख व स्थान निर्माण केले आहे. करारो इंडियाचे पुणे येथे दोन निर्मिती कारखाने आहेत. त्यापैकी एक ड्राईव्‍ह लाईन्ससाठी तर दुसरा गियर्स साठी आहे. या कारखान्यांमध्ये कास्टींग्स, मशिनिंग, असेंब्ली, प्रोटोटायपींग,टेस्टींग, पेंटींग, व हीट ट्रीटमेंट साठी अत्यंत आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे आहेत. ड्राईव्‍हलाईन निर्मिती कारखान्याची क्षमता वापर 2024 साली 81.07 टक्के आहे. तर गिअर्स कारखान्याची क्षमता वापर याच वर्षी 89.94 टक्के आहे.

30 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या माहितीनुसार कंपनीने देशातील 38 उत्पादकांना व परेदशातील सहा उत्पादकांना आपली उत्पादने पुरवली आहेत. करारो इंडियाच्या महत्वाच्या ग्राहकांमध्ये देश विदेशातील ओईएम उत्पादकांचा समावेश आहे. इतकेच नव्‍हे तर या ग्राहकांसोबत कंपनीचे 15 वर्षांच्या प्रदीर्घकाळापासून संबंध आहेत. करारो इंडिया कंपनीने कृषी ट्रॅक्टर व बांधकाम उपकरण उद्योगात विशेष कुशलता साध्य केली आहे. देशातील आठ राज्यात 220 पुरवठादारांचे जाळे कंपनीने तयार केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर 58 पुरवठादार तयार केले आहेत.

ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीएनपी पारीबा आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपन्या आयपीओच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. तसेच लींक इनटाईम इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी आयपीओची रजिस्ट्रार कंपनी आहे.

Web Title: Carraro india limited ipo opens on december 20 for subscription

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 07:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.