सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!
भारतीय शेअर बाजारात गेले काही दिवस बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच आता आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात देखील शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (ता.२०) सकाळच्या वेळी बाजाराची सुरुवात जोरात झाली असली तरी दिवसभरात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये तब्बल १,१६५.३६ अंकांनी घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील ३९२.१० अंकांनी घसरला आहे.
सेन्सेक्समध्ये तब्बल १,१६५.३६ अंकांनी घसरण
आज (ता.२०) मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समध्ये १,१६५.३६ अंकांनी घसरण झाली आहे. ज्यामुळे सेन्सेक्स पुन्हा घसरणीसह 79000 अंकांच्या खाली व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४१ अंकांच्या घसरणीसह २३,७१२ अंकांवर व्यवहार करत आहे. बाजारातील या घसरणीमुळे बीएसईचे बाजार भांडवल ४४५.०५ लाख कोटींवर आले आहे. जे गेल्या सत्रात ४४९.७६ लाख कोटी रुपये होते. अर्थात गुंतवणूकदारांना आज तब्बल 4.71 लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.
1.77 लाखाचे झाले 984 कोटी रुपये, ‘या’ शेअर्समुळे गुंतवणूकदार अल्पावधीत मालामाल!
कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले?
मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) 4027 शेअर्सपैकी 1294 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. तर 2609 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर इतर 124 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. लोअर सर्किट 228 शेअर्समध्ये स्थापित केले आहे. तर 278 शेअर्समध्ये अप्पर सर्किट स्थापित केले आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 25 शेअर्स वाढीसह आणि 5 घसरणीसह व्यवहार करत आहेत.
वाढत्या समभागांमध्ये एशियन पेंट्स ०.२२ टक्के, टायटन ०.१२ टक्के, मारुती ०.०२ टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत. टेक महिंद्रा ३.०३ टक्के, ॲक्सिस बँक २.९५ टक्के, इंडसइंड बँक २.७२ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.४८ टक्के, टीसीएस २.२८ टक्के, टाटा मोटर्स १.८१ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.८० टक्के, एसबीआय ५१७ टक्के घसरत आहे.
मिडकॅप, स्मॉलकॅप समभागांमध्ये जोरदार घसरण
आजच्या व्यवहारात आयटी समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. सकाळच्या सुमारास हे शेअर्स जोरदार व्यवहार करत होते. या समभागांच्या विक्रीमुळे राष्ट्रीय शेअर बाजार (निफ्टी) आयटी निर्देशांक 1030 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस शेअर्समध्येही मंदी आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार विक्री होत आहे. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स 313 अंकांनी घसरला आहे.
का होतीये शेअर बाजारात घसरण
2025 मध्ये फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या दृष्टिकोनानंतर भारतीय बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याशिवाय देशांतर्गत कारणांमुळे वाढती व्यापार तूट आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी यामुळे बाजाराचा मूड काहीसा बिघडला आहे.