मुंबई : होम क्रेडिट इंडिया (HCIN), आंतरराष्ट्रीय ग्राहक वित्त पुरवठादाराची वित्तीय शाखा असून यंदा भारतात आरबीआय नियामक ग्राहक एनबीएफसी (NBFC) म्हणून १० यशस्वी वर्षांची पूर्तता करण्यात आली. भारतीय बाजार तसेच वित्तीय समावेशकतेच्या दिशेने वचनबद्ध असलेली होम क्रेडिट आपल्या पहिल्या दशकात असून विश्वासार्ह तसेच किफायतशीर वित्तीय उत्पादने आणि सेवांच्या साथीने १५ दशलक्ष इच्छुकांचा टप्पा पार केला आहे.
ही पायरी गाठताना होम क्रेडिट इंडिया अभियानाचा महत्त्वपूर्ण प्रसंग – #10SaalBemisal (#10साल बेमिसाल) साजरा करते आहे, ज्यामध्ये १० वर्षांच्या लोगोचे अनावरण सोबतच होम क्रेडिटच्या वतीने कशाप्रकारे आपल्या दशकपूर्ती प्रवासात विविध टप्पे गाठून शक्ति वृद्धिंगत केली याविषयी एव्ही सादर करण्यात येणार आहे.
होम क्रेडिटचे लक्ष वित्तीय समावेशकतेवर असून देशभर कर्जसाह्य प्रवेश शक्य झाला आहे, परिणामी कर्जदार-केंद्री सेवा तसेच उत्पादने जसे की सेफ पे (भरणा सुट्टी, पूर्व-देय दंड आकार तसेच विमा नाही), केअर ३६० – व्यापक आरोग्य देखभाल सेवा संरक्षण उत्पादन त्याचप्रमाणे उज्ज्वल ईएमआय कार्ड – डिजीटल पूर्व-कर्ज मर्यादा कार्ड सादर करण्यात आली आहेत.
प्रणित धोरणाने होम क्रेडिटला भारतीय बाजारपेठेत बळकट सामर्थ्य उपलब्ध करून दिले, त्यांचे वेगवान 50K+ विक्री संपर्क जाळे ६००+ शहरांत पसरले आहे. फिजिटल मॉडेल ही नाविन्यपूर्ण पद्धत बनली असून तिचे लक्ष्य डिजीटल-फर्स्ट धोरणावर आहे, ज्या माध्यमातून दोन्ही, होम क्रेडिट ग्राहक तसेच विक्रेता भागीदारांना सेल्फ-ऑनबोर्डिंग होम क्रेडिट ॲपद्वारे शक्य झाले. होम क्रेडिटच्या माध्यमातून बी2बी भागीदारीद्वारे डिजीटल परिसंस्थेला चालना देण्यात आली, सेवा त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑनबोर्डिंग व्याप्ती वाढविण्यात आली.
निम्मे HCIN ग्राहक आता संपूर्ण ऑनलाईन प्रवासाचे पालन करतात तसेच दरदिवशी हे आकडे वाढत असल्याचे मोजमाप घटकांतून प्रतिबिंबित होते.
होम क्रेडिट इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी ऑन्धरेज क्युबिक १० वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगतात,“भारतात व्यवसायाचे दशक पूर्ण करताना तसेच लक्षावधी कर्जदात्याना सेवा देणे ही होम क्रेडिट’च्या भारताकरिता वचनबद्धतेची पोचपावती म्हणावी लागेल. १० वर्षांत, आम्ही ५० दशलक्ष करारांना सेवा उपलब्ध करून दिली आहे, ग्राहक ब्रँडची मजा घेतात, हे या विश्वासार्हता आणि खात्रीलायकतेचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. सहभागी तसेच सहाय्यक भागीदार, कर्मचारी आणि ग्राहकांशिवाय चांगला वेग राखणे कठीण झाले असते. झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणात, लोकांना आता हवे तसे जीवन जगण्यासाठी सक्षम करणे हा आमचा उद्देश एकच आहे. आम्ही १० वर्षे पूर्ण करत असताना, अजून खूप मोठा पल्ला गाठायची इच्छा आहे, त्याचप्रमाणे आकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ग्राहकांशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या, होम क्रेडिट ब्रँड पुन्हा परिभाषित करण्याचा उत्साह आणि गतीला आता आणखी चालना मिळणार आहे.”
ग्राहकांसमवेत, जबाबदार ग्राहकांकरिता कर्ज पुरवठादार म्हणून होम क्रेडिटच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर जबाबदार देणेदारी संस्कृती रुजावी यासाठी वित्तीय साक्षरतेचा प्रचार करणारा उपक्रम राबविला जातो आहे. वित्तीय साक्षरता उपक्रम पैसे की पाठशाला मायक्रोसाईट, ब्लॉग्ज तसेच सोशल मीडिया अभियानाच्या साह्याने ३ दशलक्ष लोकांना सहभागी करून घेणार आहे.
होम क्रेडिट’ने अलिकडेच आपले एकमेव सस्टेनबिलिटी कंट्री कार्ड २०२१ लाँच करत, ईएसजी तत्त्वे व्यवसायात रुजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाश्वततेचे मुख्य पैलू जसे की वित्तीय समावेशकता किंवा सर्वसमवेशी देणेदारी, वित्तीय साक्षरता, डिजिटल सबलीकरण आणि शाश्वत समुदायावर भर देण्यात आला.
भारतात कर्ज प्रवेश तसेच वित्तीय सर्वसमावेशकतेला सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित ठेवत, २०१२ पासून होम क्रेडिट इंडिया’च्या वतीने १५ दशलक्ष कर्जदात्यांची आकांक्षा देशातील 50K+ PoSes द्वारे पूर्ण केली.
होम क्रेडिट’च्या बळकट डिजिटल परिवर्तनशील प्रवासाने ग्राहक त्याचप्रमाणे विक्रेत्यांना ऑनलाईन प्रवास स्वीकारण्यास साह्य केले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.