शेती क्षेत्रातील महिलांचा कायापालट! ( सौजन्य - सोशल मीडिया )
महिलांना सक्षम करण्याच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आता एका व्यापक चळवळीत रूपांतरित झाला आहे. या चळवळीमुळे भारतातील कृषी क्षेत्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीत दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडत आहेत.
सप्टेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आलेला #2MillionWomen हा कॉर्टेवा अॅग्रीसायन्सचा उपक्रम असून, 2030 पर्यंत भारतातील कृषी क्षेत्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीत महिलांना सक्षम बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग आणि नेतृत्व वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोठ्या स्तरावरील कॉर्पोरेट उपक्रमांपैकी हा एक पहिला उपक्रम होता. शेतकरी, उद्योजक आणि समुदायाच्या नेतृत्वकर्त्या म्हणून यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, ज्ञान आणि संधी महिलांना उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
देशभरातील महिला उपलब्ध संधींचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करत आहेत. त्या शेतीची उत्पादकता वाढवत आहेत, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करत आहेत, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवत आहेत आणि आपले व्यवसाय अधिक सक्षम बनवत आहेत. तसेच कुटुंब, समाज आणि शेतकरी संघटनांमध्ये अधिक जबाबदाऱ्या स्वीकारत नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे येत आहेत.
यापैकी अनेक महिला इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. तर काही महिला स्थानिक संस्थांना अधिक सक्षम करण्यासोबतच भावी पिढ्यांसाठी प्रगतीचे नवे मार्ग निर्माण करत आहेत.
मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील महिला अनेक पिढ्यांपासून महुआची फुले गोळा करून ती कवडीमोल दराने विकत होत्या किंवा त्यापासून स्थानिक देशी दारू तयार करत होत्या. गरिबी आणि सामाजिक कलंकाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या महिलांच्या आयुष्याला महिला नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक संघटनेच्या (एफपीओ) स्थापनेमुळे नवी दिशा मिळाली.महुआच्या फुलांपासून दारू तयार करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून पौष्टिक घटकांनी समृद्ध आणि उच्च दर्जाचे ‘ट्रायबो महुआ लाडू’ तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. या बदलामुळे जंगलातून महुआची फुले गोळा करणाऱ्या असुरक्षित परिस्थितीतील महिलांचे रूपांतर आत्मविश्वास-पूर्ण उद्योजिकांमध्ये झाले. सक्षम महिला सशक्त कुटुंबे, अधिक सक्षम शेतकरी संघटना आणि मजबूत ग्रामीण समुदायांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
गेल्या दोन वर्षांत #2MillionWomen या उपक्रमाने ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. या उपक्रमाचा देशातील 22 राज्यांमधील 7 लाख 95 हजारांहून अधिक लोकांपर्यंत लाभ पोहोचला असून, त्यात 6 लाख 37 हजारांहून अधिक महिलांचा समावेश आहे. जवळपास 49 हजार महिला आता नेतृत्वाच्या भूमिकेत कार्यरत असून, आपल्या समुदायात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
केवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यापुरते मर्यादित न राहता, दीर्घकालीन परिणाम साधण्यावरही या उपक्रमाचा भर आहे. याअंतर्गत 90 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, 1 लाख 54 हजारांहून अधिक लोकांच्या उपजीविकेची साधने अधिक सक्षम करण्यात आली आहेत. तसेच 1 लाख 71 हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवर सुधारित कृषी पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. प्रत्येक आकडेवारीमागे प्रगती, संघर्षातून उभे राहण्याची जिद्द आणि नव्या संधींची एक प्रेरणादायी कहाणी आहे.
पूनम तिवारी, बांधवगड कृषी वनोपज प्रोड्युसर कंपनी, मध्य प्रदेश म्हणाल्या, “महिलांमध्ये नेतृत्व करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होणे, हा सर्वात मोठा बदल आहे. आता अधिकाधिक महिला निर्णयप्रक्रियेत सहभागी होत आहेत, बाजारपेठांशी जोडल्या जात आहेत आणि नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत. त्या स्वतःसाठी तसेच आपल्या आजूबाजूच्या इतर महिलांसाठीही नव्या संधी निर्माण करत आहेत. कॉर्टेवाच्या सहकार्यामुळे आमची संघटना अधिक सक्षम झाली असून, शेतकरी समुदायांमध्ये आमचा प्रभाव वाढविण्यास मदत झाली आहे.”
प्रवेश शर्मा, माजी व्यवस्थापकीय संचालक, लघु शेतकरी कृषी व्यवसाय संघ (एसएफएसी), भारत सरकार म्हणाले, “भारतीय शेती आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांना ज्ञान, कौशल्ये आणि संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उपजीविकेत सुधारणा होऊ शकते आणि ग्रामीण समुदाय अधिक सक्षम व संकटांचा सामना करण्यास समर्थ बनू शकतात. #2MillionWomen सारखे सहकार्यावर आधारित उपक्रम महिलांना कृषी क्षेत्रात सहभागी होण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी आणि शेतीच्या भविष्यात योगदान देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.”
श्रीधर ईश्वरन – सहसंस्थापक, समुन्नती फायनान्शियल इंटरमीडिएशन अँड सर्व्हिसेस प्रा. लि. म्हणाले, “भारतीय शेतीच्या केंद्रस्थानी महिला आहेत. ग्रामीण भागातील उपजीविकेची साधने बळकट करणे, अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे आणि समुदायाचा विकास साधणे यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांना ज्ञान, कौशल्ये आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास त्याचे फायदे केवळ वैयक्तिक शेतापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा व्यापक स्तरावर सकारात्मक परिणाम होतो”.
श्रीधर ईश्वरन पुढे म्हणाले की, “#2MillionWomen सारखे उपक्रम हे दाखवून देतात की, सातत्यपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करता येतो, त्यांच्या उपजीविकेची साधने अधिक सक्षम करता येतात आणि भारताच्या कृषी क्षेत्राच्या विकासात तसेच त्याची आव्हानांचा सामना करण्याची क्षमता वाढविण्यात योगदान देण्यासाठी महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देता येतात.”
सुब्रतो गीड, अध्यक्ष, आशिया-पॅसिफिक (एपीएसी), कॉर्टेवा अॅग्रीसायन्स म्हणाले, “भारतीय शेतीचा कणा महिलाच राहिल्या आहेत. #2MillionWomen या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या योगदानाची दखल घेतली जावी आणि त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. महिलांना कौशल्ये, संधी आणि संपर्काचे जाळे उपलब्ध करून दिल्यामुळे त्या नेतृत्वकर्त्या, उद्योजिका आणि परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्ती म्हणून पुढे येत असल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यांच्या यशामुळे उपजीविकेची साधने अधिक सक्षम होत आहेत, कुटुंबांना आधार मिळत आहे आणि समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत.
गेल्या दोन वर्षांत साध्य केलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, आमची बांधिलकी कायम आहे. महिलांसाठी अधिकाधिक संधी निर्माण करणे आणि भारतातील कृषी क्षेत्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीत त्यांच्यातील क्षमता पूर्णपणे विकसित होण्यासाठी मदत करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
शेतीचे भविष्य हे नवकल्पना, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता आणि सर्वसमावेशकतेवर अवलंबून आहे. या भविष्याच्या जडणघडणीत महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
#2MillionWomen हा उपक्रम पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना, कॉर्टेवा महिलांच्या नेतृत्वाखालील संस्था आणि उपक्रमांना सहकार्य देणे सुरूच ठेवणार आहे. तसेच कृषी क्षेत्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीत अधिकाधिक महिलांना यशस्वी होण्यासाठी आणि प्रगतीच्या नव्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.






