छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १.०४ मीटरने वाढली आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक २.७३ मीटरने वाढ झाली असली, तरी सिल्लोड आणि सोयगावसह ५ तालुक्यांत पाणीपातळी कमालीची खालावली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सून लांबल्याने १ ते ८ जून दरम्यान सरासरीच्या केवळ ३६.५ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोच्या सावटामुळे शेतकरी चिंतेत असून पुरेशा पावसाशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन करण्यात…
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कर्जमाफी योजनेला 'शेतकऱ्यांची फसवणूक' म्हटले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी नागपुरात केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ जूनपर्यंत मुख्य मान्सून येण्याची शक्यता कमी असून केवळ वादळी पाऊस पडेल. बियाणे वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले…
पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कर्जमाफी जीआरची होळी करण्यात आली. जाचक अटी रद्द करून सरसकट सातबारा कोरा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. या धान्यामध्ये दगड, कचरा तसेच कीड लागलेले धान्य आढळून आल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.
बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. गत काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे.
केंद्र सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १४ प्रमुख पिकांच्या MSP वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Bayer ने भारतीय शेतकऱ्यांसाठी आपल्या ‘फिजीटल’ नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार करत FarmRise या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे देशभरातील तब्बल ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर एसएओ ६६ राहुल सातपुते यांची ही संकल्पना आहे. या कक्षात १५६ सहायक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येऊन दिवस निश्चित करण्यात…
महाराष्ट्रातील ज्या भागात कापूस पीक धोक्याचे ठरत आहे, तिथे शेतकरी या पर्यायांचा विचार करून आपले उत्पन्न स्थिर ठेवू शकतात. कापूस कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती आणि इतर उपपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले…
युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.
Madhya Pradesh Cabinet Decisions: मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी 4 पट भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
पाकिस्तानात गव्हाच्या दरावरून आणि कॉर्पोरेट शेतीविरोधात १०० हून अधिक शहरांत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी हे नवीन संकट ठरत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.तसेच बियाण्याच्या पॅकेटवर शासनमान्य अधिकृत चिन्ह आहे का, याचीही तपासणी करावी.
दाभडी गावात 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप झालेले नाही. मात्र २०१९ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली.