भारतात येऊन सुरु केला व्यवसाय ( सौजन्य - chatgpt )
शिक्षणानंतर गडगंज पगाराची नोकरी आणि राहायला आलिशान घर असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र पृथ्वीराज यांच्या मनात काही वेगळंच होतं. बंगळुरुचे मुळचे पृथ्वीराज पॅरिसमध्ये शिक्षणासाठी होते. तिथे त्यांना नोकरीच्या मोठ्या मोठ्या ऑफर्स आल्या पण त्यांना या ऑफर्स स्विकारल्या नाहीत. कोणीही सहज घेऊन न शकणारा असा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला ते पॅरिसमधील शिक्षण पूर्ण करुन भारतात परतले.
परदेशातील इतकी मोठी संधी सोडून भारतात येण्याचा निर्णय काही सोपा नव्हता. फ्रान्समधील बहुचर्चित SKEMA बिजनेस स्कूलमधून इंटर्ननॅशनल बिझनेसमध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. फ्रांन्समधून डिग्रीपूर्ण केल्यानंतर त्यांना बऱ्याच मोठ्या मोठ्या पॅकेजचे जॉब ऑफर आले. पण त्यांनी भारतात येण्याचा मोठा निर्णय घेतला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. भारतात येवून कुटुंबाची पोल्ट्री शेडला मशरुमच्या शेतीत रुपांतर केलं. इथून सुरु झाला व्यवसायाचा प्रवास.
बंगळुरु मधील त्यांच्या देवनाहल्लीमधील गावांत पूर्वी त्यांची स्वतःची पोल्ट्री होती. काही कारणास्तव आणि वाईट काळामुळे हा व्यवसाय 2019 ला बंद पडलेला. पण त्यांना पुन्हा उभारी घेण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर त्यांनी मशरुम शेती करण्याचा विचार केला. सुरुवात अगदी लहानापासून केली. व्यवसाय करायचा म्हणून थेट मोठी गुंतवणूक आणि मोठा प्लॅन न करता. त्यांनी 10 पिशव्यांपासून सुरुवात केली. या शेतीसाठी त्यांनी बटन मशरुमऐवजी ऑयस्टर मशरुमची निवड केली. कारण या मशरुमची एक खासियत आहे. हे उत्पादनासाठी फार सोपे असतात. आणि त्याची प्रक्रियादेखील बरीच सहज असते.
व्यवसाय करायचा तर त्याला फॅन्सीपणा न आणता आणि मोठं भांडवल न गुंतवता अगदी सहज आणि सोपा पर्याय निवडला. जानेवारी 2025 मध्ये 180 रुपये 2 किलो स्पॉन आणि फ्री मिळणाऱ्या धान्यापासून फक्त 10 बॅगपासून सुरुवात केली. हा प्रायोगित प्रोजेक्ट होता. उत्पादन केलेले मशरुम मित्र आणि नातेवाईकांना वाटले. त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या आणि पुढे त्यात बदल केला. त्रुटी लक्षात घेऊन त्यात बदल केला आणि 6 मार्च 2025 से कमर्शियल उत्पादन सुरु केलं.
25 बॅग पासून सुरुवात केल्यानंतर आता हा व्यवसाय 4000 बॅगच्या सेटअपपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये वेगवेगळे चरण आहेत. त्यांच्यावर विशेष लक्ष्य देवून त्यांना आपल्या चुकातून शिकत सुधारणा केली. आता ते दर दिवशी दर दिवशी 45 किलो उत्पादन घेतात जे संपूर्ण महिन्याला 1350 किलो मशरुमचं उत्पादन घेतलं जातं. 320 किलो दराने प्रति महिना 4 लाख रुपयांची कमाई होते. त्याच्या उत्पादनाला आता डिमांडही तितकीच मोठी वाढली आहे. स्थानिक बाजार, सुपरमार्केट,जेप्टो सारख्या क्विक डिलिवरी कंपन्यांमधून मोठी मागणी आहे.
मशरुमच्या शेतीपुरतेच थांबले नाहीत तर त्यांनी या उद्योगातून निर्माण होणाऱ्या अवशेषांचा चांगला वापर केला. त्यातून त्यांनी वर्मीकंपोस्टींगची सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी ही कला इतरांना शिकवायला सुरुवात करत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामुळे फक्त फ्रन्समध्ये गडगंज पगाराच्या विळख्यात न अडकता भारतात परतून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं.
Mutual Fund गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर काय? पैशांवर राहणार कोणाचा हक्क? SEBI चे नियम काय सांगतात?






