Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिसेंबर महिन्यात बदलणार हे नियम; जाणून घ्या… अन्यथा बसू शकते खिशाला झळ!

नोव्हेंबर महिना संपला असून, डिसेंबर महिना चालू झाला आहे. या महिन्यात आर्थिक बाबींसंदर्भात अनेक नियमांत बदल होणार आहे. हे बदल जाणून न घेतल्यास तुमच्या खिशाला झळ बसू शकते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 01, 2024 | 03:29 PM
डिसेंबर महिन्यात बदलणार हे नियम; जाणून घ्या... अन्यथा बसू शकते खिशाला झळ!

डिसेंबर महिन्यात बदलणार हे नियम; जाणून घ्या... अन्यथा बसू शकते खिशाला झळ!

Follow Us
Close
Follow Us:

नोव्हेंबर महिना संपला असून, आता डिसेंबर महिना चालू झाला आहे. 2024 सालाचा हा शेवटचा महिना आहे. दरम्यान, आजपासून गॅस सिलिंडरचा दर, क्रेडिट कार्डचे नियम अशा अनेकांत बदल झाला आहे. हे बदल नेमके कोणते आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमच्या खिशावर थेट परिणाम पडू शकतो.

एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल केला आहे. गेमिंग प्लॅटफॉर्म तसेच मर्चेंटशी संबंधित कोणत्याही क्रेडिट कार्डच्या ट्रान्झिशनवर ही बँक रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाही.

एयू स्मॉल फायनान्स बँक

22 डिसेंबरपासून एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या इक्सिगो एयू क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट सिस्टममध्ये बदल होणार आहे. शिक्षण, सरकारी सेवा, किराया, बीबीपीएस संदर्भातील व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांनी साधली प्रगती; वर्षभरात मिळतायेत दीड ते दोन कोटींचा नफा!

अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड

येत्या 20 डिसेंबरपासून अ‍ॅक्सिस बँकदेखील आपल्या क्रेडिट कार्डची फीस आणि चार्जेसमध्ये बदल करणार आहे. वित्त शुल्क 3.6 टक्क्यांनी वाढवून, ते 3.75 टक्के प्रति महिना केले जाणार आहे. तसेच चेक परत आला त्याची फी 450 रुपयांनी वाढवून, तो 500 रुपये केली जाणार आहे.

बँकांना सुट्ट्या किती असणार?

डिसेंबर महिन्यात सुट्ट्या किती असणार, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात बँकांना एकूण 17 दिवस सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राज्या-राज्यांनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे बँकेत जाण्याअगोदर सुट्ट्यांचे दिवस लक्षात ठेवावेत.

ईपीएफओकडून पीएफचे पैसे काढण्यासाठी नवीन गाइडलाईन्स जारी; ‘या’ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

फ्री आधार अपडेट

तुम्हाला आधार कार्डमध्ये फोटो, नाव, पता, लिंग यात बदल करायचा असेल तर तुम्हाला 14 डिसेंबरपर्यंत ते मोफत करता येईल. 14 डिसेंबरनंतर आधार कार्डमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागेल. आधार कार्डमध्ये बदल करायचे असतील तर माय आधार पोर्टलवर जाऊन ते करता येतील.

डिसेंबर महिन्यात बँका 17 दिवस बंद राहणार; जाणून घ्या… कोणत्या दिवशी असणार बॅंकांना सुट्टी?

मालदीव टूर महागणार

या महिन्यापासून मालदीवची यात्रा महागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इकोनॉमी क्लासमधून प्रवास करण्यासाठीचे शुल्क 30 डॉलर्सहून (2532 रुपए) 50 डॉलर्स (4220 रुपए) करण्यात येणार आहे. बिझनेस क्लाससाठी हे शुल्क 60 डॉलर्सहून (5064 रुपए) 120 डॉलर्स (10129 रुपए) मोजावे लागतील.

Web Title: December month started know what banking credit card gas cylinder financial rules changed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 03:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.