
DMart Discounts on 'Big Saving Day'
DMart Discounts: DMart मध्ये सामान्य असो की मध्यमवर्गीय ग्राहकांची खरेदी करताना बचत होते. मात्र, तुम्ही जर ‘बिग सेव्हिंग डे’ दिवशी गेलात तर तुम्ही मेगा डिस्काउंटमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची बचत कराल. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..
डी-मार्ट (DMart) हे खरेदी करण्यासाठी सामान्य असो की मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. अगदी श्रीमंत वर्गातले लोकं सुद्धा डी मार्टमधून खरेदी करतात. एकाच ठिकाणी सर्व काही आणि तेही माफक दरात मिळत असल्याने ग्राहकांची याला जास्त पसंती असते. त्यामुळे डी मार्ट कडे ग्राहक आपोआप आकर्षित होतात. किराणा, कपडे आणि घरगुती वस्तू अगदी सगळ्या वस्तु MRP पेक्षा कमी दरात मिळत असल्याने खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण जर तुम्ही ‘बिग सेव्हिंग डे’ च्या वेळी खरेदीला गेलात तर फायद्यात राहाल.
डी-मार्टमध्ये तशी ग्राहकांसाठी खरेदीवर सवलत असते. पण आठवड्याच्या काही दिवसांसाठी ही सवलत अधिक प्रमाणात असल्याने ग्राहकांसाठी खास ठरते. या दिवसांसाठी बहुतांश वस्तूंवर MRP पेक्षा कमी दर उपलब्ध करण्यात येतो. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात बचत होते. जसे की, Buy One Get One free, 50% OFF सारखे मेगा डिस्काउंट असतात. सहसा हे ऑफर्स सणासुदीच्या काळात असतात. मात्र, Dmart आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसात यांसारख्या खास ऑफर्स देत आहे. यामुळे तुम्ही डी मार्टमध्ये त्या दिवशी खरेदीसाठी गेलात तर तुमची मोठी बचत होवू शकते.
‘बिग सेव्हिंग डे’ मध्ये तीन दिवसांचा समावेश केला जातो. यामध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांचा समावेश आहे. शुक्रवारी सेलची दमदार सुरुवात करण्यात येते. ज्यामध्ये शक्यतो किराणामाल, तेल, डाळी, आणि साबण यांचा मोठ्या प्रमाणात स्टॉक असतो. तुम्हाला गर्दी तुलनेने कमी असल्याने आवडीचे ब्रँड सहज मिळवणे शक्य होते. त्यामुळे शुक्रवारी डी मार्टमध्ये खरेदी करण्यास बरेच जण प्राधान्य देतात.
त्यानंतरचा दिवस म्हणजे शनिवार.’पीक डे’ किंवा कॉम्बो ऑफर्स जास्त करून शनिवारी असतात. हा डी-मार्टचा पीक डे असल्याने सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. 50% ऑफ आणि आकर्षक कॉम्बो पॅक ऑफर्स अधिक प्रमाणात असतात. तर रविवार विकेंडचा शेवटचा दिवस असल्याने, काही निवडक उरलेल्या स्टॉकवर अतिरिक्त 10% ते 20% पर्यंत सूट मिळते. दिवाळी, दसरा यांसारख्या सणांच्या दिवशी मोठी खरेदी करायची असल्यास फायदेशीर ठरतात. याव्यातरिक्त, DMart Ready ॲप वापरत असल्यावर सोमवार किंवा बुधवारला विशेष ऑनलाइन डील्स आणि कूपन्स मिळाल्याने बचत होते.